20 August 2009

भन्नाट निबंध

एका सुपीक डोक्यातून आलेला हा भन्नाट निबंध...

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी

मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.

कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.

कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.

कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.

कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. म्हणुन माझा आवडता पक्षी कोंबडी आहे.

5 comments:

Asha Joglekar said...

मलाकाही कल्पना नाही कारण कोंबडी अन् गांधीजीं सारखी मी पण शाकाहारी आहे.

Sonal said...

:-) mi pan..

Sonal said...

मला आपल्या दोघींबद्दल आदर वाटतो!! :-))

prajkta said...

nad khula...............

Unknown said...

Kahitari bhankaj lihile aahe bad bad eassy