शाळेत असताना पासून काही वाचनात आलं आणि मला आवडलं की मी माझ्या वहीत डायरीत ते टिपून ठेवायची. कथासंग्रह, कवीता, मुक्त लेखन असं थोडंफार वाचन झालं माझं. त्यात विशेष आवडलेलं म्हणजे व,पु. काळॆंच वपूर्झा. त्या पुस्तकाची पारायणं झालीत. एकदा मागे esnips साईट वर वपुर्झाची एक ऑडियो सापडली. ती इथे अपलोड केलीच आहे. असो!!
व्यक्ती, नातेसंबंध, वस्तू, यांवर अनेक कविता किंवा चारोळ्या माझ्या वाचनात आल्या... ऋतूंवरील चारोळ्या एकदा कॉलेजमध्ये असताना वाचनात आल्या होत्या. त्या चारॊळ्या मी माझ्या डायरीत लिहून घेतलेल्या. वाचनात आलेल्या पुस्तकांमधली कोटेशन्स, एकादा पॅरेग्राफ, कोणा शायराची शायरी... एक ना अनेक टिपणं होती त्यात. काळाच्या ओघात ती माझी डायरी कुठंतरी ठेवण्यात आली आणि नंतर या पुस्तकामागून त्या पुस्तका मागे अशी मागं सरकत कपाटाच्या कोपर्यात जाऊन बसली. कदाचित डायरीनंच मला बोलावलं असेन... काय माहिती? ८ - १० वर्षांनंतर तो कोपरा चाळवल्या गेला... तर ती डायरी सापडली. स्वच्छ पांढरी पानं पिवळसर झाली होती. पण पानांची इस्त्री गेली नव्हती... एकही पान मऊ पडलं नव्हतं. ताठा एकदम तसाच... पहिल्या सारखा...
त्या माझ्या डायरीतली निवडक वेचणं मी माझ्या कोट्स या ब्लॉगवर देणार आहे. त्याचा दुवा हा...
http://unreadquotes.blogspot.com/
~ सोनल
04 September 2009
Subscribe to:
Posts (Atom)