एक शांत रम्य संध्याकाळ! शांत समूद्र शांत लाटा... किनार्याकडे झेपावणर्या... नारळीच्या झाडातून वाहणारा वारा.... सगळं शांत होतं. मानसी एकटीच उभी होती.... न जाणे किती वेळ..... रेडियोवर वो लम्हेचं गाणं सुरू होतं... चल चले अपने घर ऎ मेरे हमसफर... "काय गं? कसला विचार करतेस?" अभीच्या या वाक्यानी मानसी भानावर आली. अभीच्या हातातला कॉफीचा मग घेत मानसीनं मान नुसतीच हलवली.
मानसी आणि अभी.... लहानपणापासूनचे मित्र. एकाच शाळॆत आणि एकाच वर्गात शिकलेले. दोघंही अभ्यासात अगदी हुषार नसले तरी ८५ ते ९०%च्या घरात होते. १२वी नंतर त्यांनी मिळूनच ईंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेला. अभीला कंप्युटर शाखा मिळाली तर मानसीला ईलेक्ट्रोनिक्स. दोघंही फर्स्ट क्लासचे विद्यार्थी. लहानपणाची ओळख नंतर प्रेमात बदलली हे फायनल ईयरच्या गॅदरिंग दरम्यान कळलं. कळलं म्हणण्यापेक्षा मित्र मैत्रिणींच्या चिडवण्यानं दोघं वेगळे झाले. आपण बोललो नाहीत की नंतर आठवण येते आणि हे जरा विचित्र आहे असं दोघांनाही जाणवलं. मानसीनं तसं बोलून दाखवलं... आणि अभी.... तो मात्र विचारून मोकळा झाला. "मानसी मी तुझ्या प्रेमात पडलोय... तू पडली आहेस का माझ्या प्रेमात?" मानसी दंग होऊन पाहतच राहिली. ती पुढं काही बोलणार त्याच्या आत अभी बोलला... "मी लगेच "हो म्हण" असं म्हणत नाहीये. तू विचार कर आणि मला सांग. कधी कुठे आणि कसं सांगायचं ते तू ठरव." नेहेमी प्रमाणे तिच्या खांद्यावर हात ठेवून अभी शांत निघून गेला. रोज जाताना एकदा मागे वळून पाहणारा अभी आज वळला नाही. तो गेला त्या वाटेकडे मानसी खुप वेळ पाहत होती. अगदी तो नजरेआड होईपर्यंत. रोज एकत्र जाणारे दोघं आज वेगळे जात होते. ग्रुपला जाणवलं होतं की काहि तरी झालय... कुठं तरी बिनसलय. पण कोणी काही म्हणालं नाही. त्यांची मैत्री पुढे गेली असेल याचा कोणी विचारही केला नाही. सगळे अजूनही एकत्र बसत होते. त्यावेळी त्यांच वागणं वेगळं नसायचं. म्हणजे कोणाला तीळमात्र शंकाही आली नाही. पण आज दोघांना वेगळं जाताना पाहून सगळे चकित झाले होते.
दुसर्या दिवशी सगळ्य़ांनीच दोघांना घेरलं. "काय रे तुमचं भांडण झालं नाही ना?" एक ना अनेक सगळ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अभी नुसताच हसला.... मानसी कडे पाहिलं आणि तो गप्प बसला. " हे काय चाललय तुमचं?" चैताली वैतागून म्हणाली, " आपला ग्रुप एक आहे आणि इथं भांडणं सुरू करू नका.".... मानसी काही बोलणार इतक्यात अभीनं मौन तोडलं. "आमचं भांड्ण झालं नाहीये. बस्स थोडे दिवस बोलणार नाही आहोत. एवढच काय ते.!!!" अभीच्या या शांत उत्तरावर मानसी चपापली. बॉल आपल्या कोर्टात त्यानं सहज टाकलाय हे तिच्या लक्षात आलं. आणि आपल्या या अबोल्याचा जेवढा त्रास स्वतःला होतोय तेवढाच त्यालाही होतोय हे तिला जाणवलं. घरी कसं सांगावम या विचारात मानसी कॉलेज मधून निघाली. घरी अभी सगळ्यांनाच माहित होता. त्याच्याबद्दल घरी सगळे चांगलं बोलतात, सगळे त्याच्याशी चांगलं वागतात हे तिला माहित होतं. पण आपल्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या प्रेमाचा स्विकार करावा की करू नये या मनःस्थितीत होती ती. घरी सगळे चिडणार हे तिला वाटत होतं.
दरम्यान डिग्री संपली. आणि सगळेच आपापल्या मार्गी लागले. पुढले काही महिने दोघं अबोलच होते. अभीनं तिला कधी विचारलं नाही ना तो घरी यायचं थांबला. त्याचा वावर सहज होता. मानसीला काय करावं कळत नव्हतं. आणि या मनःस्थितीत सुलू मावशी धावून आली. तिनं सहजच अभीचं स्थळ सुचवलं आणि कोणी नाही म्हणू शकलं नाही. आणी नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं ही. बोलाचाली झाल्या, साखरपुडा झाला, लग्नं ही पार पडलं. दोघांची नोकरी सुरू झाली. अभी आणि मानसीचा दिवस नोकरीत जायचा. संध्याकाळी दोघं एकत्र मिळूनच काम करायचे.
४ ५ वर्षात दोघंही नोकरीत जम बसवले होते. अभीजित टींम लिड झाला होता. त्याच्य़ स्वप्न विस्तारली होती. सकाळी साडे सात ते रात्री ९ पर्यंत तो नोकरीतच असायचा. घरी आलं की तो आधी सारखा तिच्या भोवती रुंजी घालायचा नाही. त्याचं आपलं काम आणि नोकरीच्या गप्पा असायच्या. मानसी विचार करायची मी कुठं चुकते आहे का?
आणि याच विचारात ती आज उभी होती. हा शांत समूद्र आपण किती वेळा अनुभवला आहे. किती वेळा त्याचा आवज ऐकला आहे, किती वेळा लाटेसोबत खेळलो आहोत... त्या पाण्यात भिजलो आहोत... पण आज हे सगळं वेगळं वाटतय! अभी दुरावल्यासारखा वाटतोय. माझा अभी....!! माझ्यासोबत होता तो, माझा मित्र, माझा सखा आज असा दुरावल्यासारखा वाटतोय. मला पाण्यात पडू नये म्हणून सगळ्य़ांसमोर बीचवर हात धरणारा अभी आज काल थोडा लांबूनच चालतोय.... आपल्याच विचारात. काही विचारलं तर म्हणे भविष्याचा वेध घेतोय!! विचार करतोय... "असं काय रे अभी?" आज मानसी न राहवून बोलली. "का?? काय झालं?" अभी म्हणाला. "अरे, किती दिवस असा अबोल राहणार आहेस?" "मी? छे गं तुझं आपलं काही तरीच सुरू असतं!!" "तसं नाही रे अभी. पण किती दिवस असा कामाच्या मागे धावणार आहेस? आपण किती दिवसात निवांत बोललो नाही. हात धरून बीच वर चाललो नाही..... मानसी पुढे बोले पर्यंत अभी पट्कन पुढे आला. मानसीचा हात धरून म्हणाला,"मी हे आपल्यासाठी, आपल्या घरासाठीच करतोय ना." तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला,"जास्त काम केलं की जास्त पैसे मिळतात. मग सेव्हींग सहज बाजूला पडते. खर्च करायला हात सैल राहतो. आपलं बालपण काटकसरीत गेलं. मग आता थोडे जास्त कष्ट केले की थोडी करमणूकीसाठी मोकळा खर्च करता येतो." अभी बोलत होता. मानसी मन घट्ट करून ऐकत होती. "अरे पण या पैशाच्या मागे किती दिवस पळायचं?"
लग्नानंतर सगळं खुप छान सुरू होतं. पण मानसी एकटी पडली होती. आज खुप दिवसांनी अभीनं शनिवारी सुट्टी घेतली होती. दोघं समूद्रावर फिरायला गेले होते. कित्येक दिवसांनी हातात हात घालून गेले होते दोघं. मानसी हळवी झाली होती. अभीचा हात तिला सोडावासा वाटत नव्हता. एक दोन वेळा त्यानं सोडवून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण मानसीनं घट्ट धरून ठेवला होता. कसं बोलावं यासाठी ती तयारी करत होती. शब्द शब्द जुळवण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाक्य जुळवता येत नव्हतं. "तू मला सगळं आयुष्य मदत केलीस रे!! कशाची कमी भासू दिली नाहीस. तुला कोणीही पैशाचा तगादा लावला नाहीये. अभी, घरी सगळे तुझ्याबद्दल विचारतात. तुझी काळजी घेतात. मी आहेच रे पण आई बाबा सुद्धा!!! माझी नोकरी आहे तुझी नोकरी आहे. आपला पगार मिळून निवांत मोकळा खर्च करू शकतो रे अभी. अरे, ही वाट जिच्यावर तू चालला आहेस ना ती तुला आम्हा सगळ्यांपासून दूर नेते आहे. अरे पैसे कमावणं आणि तो खर्च करणं हे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी इतरांच्या मनाचा विचार कर ना. माझा विचार कर... आपण गेल्या कित्येक दिवसांत एकत्र बसून बोललो नाहीत. ना तू मला विचारलसं तू कशी आहेस म्हणून.... आपण मिळून बाहेर गेलो नाहीत. आपलं ऑफिस, मिटींग्स, टुर्स.... वेळ घालवतोय असं म्हणायचं नाहीये मला. पण मला भिती वाटतिये तू दुर जातोयस माझ्यापासून......" न बोलावसं वाटणारं वाक्य शेवटी मानसी बोलून गेली.
खुप वेळा तिच्या मनात हे वाक्य येऊन गेलं होतं. पण ती बोलली नव्हती. आपल्याच विचारात मानसी पुढे गेली. अभीनं हात कधी सोडवून घेतला हे तिला कळलं ही नाही. समूद्राची लाट पायावरून गेली. थंड पाण्याच्या स्पर्शानं ती भानावर आली. अभी मागं राहिल्याचं तिच्या लक्षात आलं. वळून पाहते तो अभी दोन शहाळी घेउन येत होता. खुप दिवसांनी शहाळं शेअर केलं. मानसीनं हात धरला नव्हता. अभीनं पुढे होऊन हात धरला. एका स्टॉलवर गाणं लागलं होतं....
पत्थर के ईन रस्तोंपे
फुलों की एक चादर है
जबसे मिले हो हम को
बदला हर एक मंजर है!!
31 May 2007
Subscribe to:
Posts (Atom)