21 August 2009

Hilarious Essay

My friend forwarded this mail to me. Originally it is in Marathi language. Trying to translate it in English. Enjoy!!!

Essay topic :- My favourite Bird : Hen

I like all animals and birds. They taste yummy. Hen is specially tastier than other animals and birds. So I like hen more than other animals and birds.

Different tasty eatables can be made from Hen. I cant cook them. But I can eat them.

Hen is vegetarian. So I feel respect for Hen. Mahatma Gandhiji was also vegetarian. So I feel respect for him too.

Hen gets fever too. When human beings get fever, they boil water and drink. But if they eat a Hen having fever, then that man can get that fever and all his/her worries can be vanished forever. This fever is known as "Bird flu" or something. I dont know Mathematics and English. I get fever when I study them in school.

When we hit stone to a Hen she makes "Pakaak" noise. I like that noise. So I like Hen.

~~~~~~~~~~


The original post of this translation is at the following link. If you understand Marathi you will enjoy the original post more than this translation

Link for original marathi post. :- http://majhidiary.blogspot.com/2009/08/blog-post_20.html

20 August 2009

भन्नाट निबंध

एका सुपीक डोक्यातून आलेला हा भन्नाट निबंध...

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी

मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.

कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.

कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.

कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.

कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. म्हणुन माझा आवडता पक्षी कोंबडी आहे.

08 August 2009

दुधवाले मामा

संध्याकाळी नेहेमी प्रमाणे खाली फिरत होते. अनेक वर्षांनी मी गवळी पाहिला... डोक्याला मळकट फेटा बांधलेला, सायकलला बांधलेली दुधाची कॅन, मागे लटकवलेली लिटर - अर्धा लिटरची मापं, आणि सायकलला बांधलेल्या त्या टिपीकल तुपकट ओशट दोर्‍या.. निमीषार्धात मी जवळ जवळ १२ १३ वर्ष मागे गेले. माझ्या डिग्रीची ही गम्मत आठवली... माझ्या सोबत इंजिनियरींगला शिल्पा होती.. माझी पहिली पासूऩची मैत्रिण... अगदी पहिली मैत्रिण.. आमचा ठेपा कायम तिच्याकडे असायचा. स्पेशली परीक्षेच्या आणि सबमिशनच्या काळात.. नाईट-आऊट्स असायचे.. तर शिल्पाकडे दुध द्यायला गवळी यायचे. आम्हा सगळ्याचे ते दुधवाले मामा होते. बाहेर फटफटी थांबल्याचा आवाज आला की आम्हाला समजायचं की दुधवाले मामा आले.... काकू, म्हणजे शिल्पाची आई, कायम म्हणायची," मामा दुध पातळ देताय..." आणि दुधवाले मामांचा ठरलेला जवाब असायचा, " नाही हो बाई, दुधच तसं येतयं..." आम्ही सगळेच हसायचो या संवादाला.. वर्ष सहा महिने हे सगळं निवांत आणि सुरळीत चाललं होतं... कॉलेजला येता जाता दुधवाले मामा दिसायचे... एक दिवस दुधवाले मामा पाण्याच्या नळाजवळ कॅन धुताना दिसले. कॅन धुवून त्यांनी धुतलेल्या कॅन मधलं पाणी दुसर्‍या कॅन मधे टाकलं.. आम्ही मैत्रिणींचा आगाऊपणा उफाळून आला... "काय मामा कॅनमधे दुध आहे का?" आम्ही मस्करी करत विचारलं. आमच्या मस्करीला मामांनी मस्करीत उत्तर दिलं "हो... आहे.. :-))" आणि बास!! त्या नंतर आम्ही सगळे त्यांना चिडवायचो, " मामा, तुम्ही दुधात पाणी घालून देता." आणि नेहेमी प्रमाणे मामाही ठरलेलं उत्तर द्यायचे," नाही दुधच तसं येतं"...

"चल पाऊस येतोय. लाईट जायच्या आत घरी जाऊ" या वाक्यानं भानावर आले. आज १२ १३ वर्षांनी गवळ्याला पाहिलं आणि जुन्या आठवणीचा कोनाडा पुन्हा उघडला... आमच्या डिग्रीच्या वेळी ते मामा म्हातारे होते.. आज कसे असतील? अजूनही तेच दुध पुरवत असतील का शिल्पाकडे? आम्ही पाणीवाले मामा म्हणायचो त्यांना.. त्यांना आठवत असू का आम्ही? एक ना अनेक प्रश्न मनात येत गेले.

कधी मधे नांदेडला जाणं झालं तर काकूंना नक्की त्यांच्या बद्दल विचारेल.

~ सोनल