सारेगम - १९९८
सा रे ग म ची मी असंख्य फ़ॅन्स पैकी एक! अगदी पहिल्य एपिसोड पासून आज पर्यंतच्या एपिसोड्स पर्यंतचे अल्मोस्ट सगळॆ एपिसोड्स मी पाहिलेत. संजीवनी भेलांडे, बेला शेंडे, हमसिका अय्यर, सुदेष्णा, मुकुंद फणसळकर, पार्थिव गोहिल, मोहम्मद वकील, अमेय दाते, त्यागराज खडिलकर हे सगळॆ त्यावेळेसच्या पार्टीसिपण्ट्सपैकी होते. सारेगमचा सेट अगदी साधा होता. पण जे परिक्षक यायचे ते दिग्गज होते. खय्याम साब, अनिल विश्वास, परवीन सुल्ताना, ओ.पी. नय्यर, पं. जसराज, हरिप्रसाद चौरासिया, पं. रवीशंकर असे सगळे एकाहून एक सरस परिक्षक होते. त्यावेळेसचे राऊंड्स ही अवघड होते. नॉन ऑर्केस्ट्रा राउंड-ज्यात गाणं म्हणताना मागे वाद्य वाजायची नाहीत, कॉर्ड राउंड-ज्यात गाण्याची ओरिजिनल पट्टी सोडून वेळेवर दिलेल्या नव्या पट्टीत गाणं म्हणायला लागायचं, जजेस चॉईस राऊंड-जिथं वेळेवर परिक्षक जे गाणं देतील ते गाणं गायला लागे.... एकूणच स्पर्धकाचा कस लागायचा.
सारेगमप - २००८
सारेगमप चा पुर्वीचा सुत्रधार सोनू निगम सोडून गेला आणि सारेगमची वाट अचानक उतरतीला लागली. मधली २ वर्ष सारेगम एकदमच बोअर व्हायला लागलं. पण शान आला आणि सारेगमपमध्ये पुन्हा जीव आला असं मी म्हणेन. नव्या काळाला अनुसरून सेट बदलला गेला. पण गाणी राऊंड्स आणि जजेस यांना स्कोप होता. मधल्या काळात मी टिव्हीपासून तशी बर्यापैकी दुरावले. आणि पर्यायानं सारेगम पासूनही. पण युट्युबवर सारेगमपच्या गेल्यावर्षीच्य़ा क्लिप्स पाहिल्या आणि वाटलं या sms च्या भडिमारात गाणं दुरावतय सारेगम पासून.
जजेसची आपापसातली भांडणं, माझा स्पर्धक श्रेष्ठ आणि तुझा कनिष्ठ आणि प्रेक्षकांचे sms या मध्ये स्पर्धकाचा कस ओळखला गेला नाही. पुनम यादवचं स्पर्धेतून बाद होणं, लिट्ल चॅम्प्स मधून वसूंधराचं बाद होणं... या अशा घटनांमध्ये वाटतं जर sms पद्धती ठेवायचीच आहे तर स्पर्धेला परिक्षक बोलावूच नये. आजचं सारेगम पाहताना वाटतं प्रायमरी स्कूलच्या गायनाच्या स्पर्धेला हायस्कूलचे विद्यार्थी जज म्हणून बोलावले आहेत.
या पोस्ट्चा हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नाहीये. सारेगमच्या smsच्या पद्धतीत चांगले स्पर्धक आणि सोज्वळ स्पर्धा बाद होते आहे. या पोस्टद्वारे सारेगमपच्या गजेद्र सिंगला एक विनंती आहे. सारेगमच्या आजपर्यंतच्या यशात तुमच्या टीमची खुप मेहनत आणि परिश्रम आहेत. परंतू sms पद्धतीने सारेगमची जुनी ओळख झाकली जाते आहे. तुमचा हेतू चांगला आहे यात शंका नाही. पण जुनं सारेगम पाहताना जसं हरवून जायचे तसं आजचं सारेगम पाहताना होत नाही. काहीतरी चुकतयं. काय चुकतय आपण जाणता. जुनं सारेगम आम्हाला परत द्याल?
जुन्या सारेगमची एक विजेती होती स्नेहा पंत. तिचा हा व्हिडिओ. इथं एम्बेड करता आला नाही. नक्की पहाल. मला काय म्हणायचं आहे कदाचित तुम्हाला कळेन.
सारेगमपच्या यशासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
02 March 2008
Subscribe to:
Posts (Atom)