07 November 2008

मला बदलायचयं

बरेच दिवस मी कोणाच्या ब्लॉगवर गेले नाही. आज संध्याकाळी जरा सवड काढली आणि गुगल वर सर्च मारला... अमिर खानच्या ब्लॉगच्या पत्त्यासाठी. त्याच्या नावाचा एक ब्लॉग सापडला. आता तिथे त्याचं नाव, एकदम सॉफिस्टिकेटेड भाषा आणि सगळं मुद्द्याला धरून लिहिलेलं होतं म्हणून मी ही माझ्या भोळ्या मनाची समजूत घातली की बये हा ब्लॉग आमिर खानचाच आहे हे मनात ठेवून वाच. उगाच चिकित्सा करत बसलीस की हा ब्लॉग आमिरचाच कशावरून? त्यानीच लिहिलं हे कशावरुन? बरं मिळालेल्या हजारो प्रतिक्रिया या वाचकांनीच दिलेल्या हे कशावरून? तर मग वाचन आणि मनन दुरच राहिल. त्या पेक्षा छान मन लाऊन वाच आणि चिकित्सा करू नकोस! मी त्या ब्लॉगवरची पोस्ट वाचली. आणि कॉमेंट द्यायचा विचार केला. मग वाटलं चित्रीकरणाच्या घाई गर्दीत याला ज्या हजारोंनी कॉमेंट्स येतात त्या हा कधी वाचतो? कधी त्याचा रिप्लाय देतो?

पोस्ट वाचून झाल्यावर एक मनात आलं... आपण ही आपलं वाचन, लिखाण थोडं बदलायचं. भाषेवर थोडी पकड आणायची. आणि स्वतःला थोडं बदलायचं. हा बदल कॉमेंट्स मिळवण्यासाठी नाही तर स्वतःला थोडं अजून सुधरवण्यासाठी... बाहेरच्या दुनियेत थोडंसं वेगळं उठून दिसण्यासाठी... मोजक्याच का होईना पण लोकांनी माझं लिखाण वाचावं आणि विचारावं "अरे... ते ब्लॉगवर लिहिणारी सोनल तूच का?"....

शुभस्य शीघ्रं!! Wish me best luck....