31 December 2008

नववर्षाच्या शुभेच्छा!

२००८.... वर्ष कसं आलं आणि कसं गेलं काही कळलंच नाही. टिव्हीवर काही कार्यक्रम असला तर बघावा या सदहेतूने मी टी.व्ही. लावून त्याच्याकडे डोळे लावून बसले... आठ वाजले तरी नॉन-दुरदर्शन चॅनल्सवर काही रंगारंग कार्यक्रमच लागला नाही. साधारण १५ - २० वर्षापुर्वीचा काळ आठवला... आम्ही चौथी पाचवीत असू... ३१ डिसेंबर म्हणजे मस्त कार्यक्रम असायचे. संध्याकाळी ७ वाजल्या पासूनच टि. व्ही वर (दुरदर्शनवर)... गाणी, एकपात्री, गप्पा, जादूचे प्रयोग... आणि निखळ मनोरंजन... आई पपांसोबत बसून न लाजता बघण्यासारखे कार्यक्रम.... पूर्ण वर्षभरात आम्हाला ३१ डिसेंबरला रात्री उशीरापर्यंत जागायची मुभा असे. समाधी १०.३० पर्यंत लागायची ही गोष्ट वेगळी. पण मजा मात्र खुप यायची. जेवणं लवकर लवकर आटोपून आम्ही टि.व्ही. समोर येऊन बसायचो आणि मग आधी ताठ बसलेली आमची गाडी थोड्यावेळानी उशीला टेकायची, मग अजून थोड्यावेळानी पालथी पडून टि.व्ही.चा आनंद घ्यायची. मग डोळे बंद व्हायचे आणि आम्ही हळूहळू निद्राधीन व्हायचो.

काळानुसार सगळं बदलतं असं म्हणतात. टि.व्ही ही बदलला, कार्यक्रम बदलले, नवीन चॅनल्स आणि त्यांच्या धांगडधिंग्यात मनोरंजन कधी हरवलं कळलच नाही. रटाळ निवेदन, आई पपांसोबत बसून न पाहता येणारे कार्यक्रम आणि मग एकतर टि.व्ही. बंद व्हायचा किंवा कार्यक्रम कोणी बघायचं नाही. अचकट विचकट हावभाव, टुकार कार्यक्रम आणि दिवसभराच्या रामरगाड्यानं येणारी झोप... या सगळ्यात गेल्या ७ - ८ वर्षात मी नववर्षाचाअ कार्यक्रम रात्री जागून पाहिला नाही.

असो!

हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समाधानाचं जावो, सर्व आशा आकांक्षा पूर्ण करणारं जावो ही सदिच्छा!

सोनल :-)

माझा नवीन ब्लॉग

निर्वाणषटकावरील विवेचनासाठी मला एक e mail आलेली की हिंदी मध्ये पोस्ट कराल का? हिंदी अनुवाद मी एका नवीन ब्लॉगवर पोस्ट करते आहे. हा त्याचा दुवा

हिंदी भाषेचे ज्ञान यथा तथाच असल्यानं जर काही चुका तुम्हाला अढळल्या तर त्या कृपया कॉमेंट्समध्ये नमूद कराव्यात. तीन पोस्ट्स दिल्या आहेत. चुकभूल माफ करा...

सोनल

निर्वाणषटक पर विवेचन - श्लोक ३

न मे द्वेष रागो न मे लोभ मोहौ । मदे नैव मे नैव मात्सर्यभाव ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ३ ॥

द्वेष, राग, लोभ, मोह, मद, तथा मात्सर्य (मत्सर) यह सारे मनके भाव। लेकीन पहले दिये दो श्लोकोंसे यह ध्यान मे आता है के जहां अष्टधा प्रकृती अपनी नही, वहीं उस प्रकृतीमे बसा मन भी अपना नही। और इसलिये उस मन से संलग्न भाव भी अपने नही। मेरा मन ही मुझमे ना होने के कारण, तथा मेरा अहंकार पुर्णतः नाश होनेके कारण मन के सारे विकार नाश हो गये। वह भावनाये जाने के कारण उनकी वजहसे आनेवाले दोष भी नाश हो गये। जैसे किसी गहने से मिलावट निकालनेके बाद १६ आने सोना पिछे रह जाता है, वैसे ही "अहं भाव" नष्ट होनेसे सिर्फ़ आत्मारूप परमेश्वर का अंश रह जाता है। इसलिये आचार्य कहते है के, मन के सारे विकार नष्ट होनेसे मै निर्विकार हो गया हू। म्हणतात की मनाचे सर्व विकार जाऊन मी निर्विकार झालो आहे. सत चित आनंदरूप शिवरूप हो गया हू।

27 December 2008

निर्वाणषटक पर विवेचन - श्लोक २

न च प्राण संज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुर्न वा पंचकोश ।
न वाक् पाणी पादौ न चोपस्य पायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ २ ॥

वायू प्राण है। प्राण एक शक्ती है जो शरीरमे चेतना निर्माण करती है। यह प्राण सर्व सजीवामे होता है। सचेतन दुनिया के एकपेशीय सुक्ष्म जीवसे लेकर, अतिविशाल शार्क मछलीतक एकही प्राण, वही भगवानका अंश होता है। यह प्राण वायूपर अवलंबित रहता है।

एक श्वास सजीवोंमे चैतन्य है या नही यह दिखा देता है। और इसी लिये हम चैतन्यमय प्राण कहते है। इस तरहसे यह प्राण वायूपर निर्भर रहता है। परमात्मा का अंश मतलब आत्मा। आत्मासे निर्माण की हुई शक्ती मतलब प्राण। इसका मतलब यह के प्राण तो परमात्मा का अंश हुआ, परमात्मा का एक भाग हुआ। प्राण के पंचक व्यान, समान, अपान, उदान व प्राण यह है। यह सब तथा वायू मिलकर प्राण अर्थात आत्मा हुआ।

श्री शंकराचार्यजी कहते है के जो प्राण, पंचवायू मतलब आत्मा का एक भाग हुआ वह आत्मा ही परमेश्वरका अंश है। मेरा कुछभी नही है। यह देह, यह शरीर सप्तधातूसे बना है। वह सप्त धातू मतलब रस, रक्त, मेद, स्नायू, अस्थी, मज्जा, तथा शुक्र है। अन मतलब गती। आन मतलब ले जाने वाला, गती देनेवाला।

प्र + आन = प्राण मतलब हालचाल देनेवाला। यह मुख्यतः खून मे होता है।
अप + आन = अपान मतलब नीचे ले जानेवाला। शरीररस मे अपान होता है।
उद + आन = उदान मतलब उपर ले जानेवाला। यह काम स्नायू कर्ते है। इसलिये उदानका काम स्नायूमे होता है।
सम + आन = समान मतलब समतोल बनाये रखना। यह कार्य हड्डी का होता है।
वि + आन = व्यान मतलब विशेष हालचाल जो चरबी तथा मेद का कार्य होता है।

श्री. शंकराचार्यजी कहते है, यह प्राण, वायू, सप्त धातू, यह पंचकोश ये मेरे नही। क्योंकी यह सर्व देहसे संलग्न है। उनका व्यवहार देह के साथ चलता है। देहसे चैतन्य खतम हुआ तो इनका कार्य भी खतम होता है। आत्मासे इनका कुछ भी संबंध नही है। आत्मा जैसा है वैसाही रहता है।

इसही तरह वाक, पाणी, पादौ, चोपस्य, पायु यह सारे शरीरसे, विनाशी तत्वसे संलग्न है। यानी की शरीरके साथ ही उनका व्यवहार चलेगा। देह अथवा शरीर का नाश हुआ, शरीरसे चैतन्य गया, शरीर मृत हुआ तो इनका कार्य भी खत्म होता है। मतलब जो शरीरसे संलग्न है वो शरीरके साथ ही खत्म होते है। श्री. शंकराचार्यजी कहते है के ये सब शरीरके साथही जानेवाले है इसलिये मेरे है ही नही। तो, जो मेरा नही है उसके लिये मुझे कुछ भावना नही है। इसलिये मै मेरे भगवान स्वरूप आत्मा का हूं। मै सिर्फ शिवरूप और शिवरूपही हु। मेरे शरीरका व्यापार चलानेवाला तत्व मेरा नही। शरीरका अस्तित्व, पाच कोष ( अन्नमय, प्राणमय, मनोमय., विज्ञानमय, आनंदमय) मै नही। जिस कर्मेंद्रियके कर्तृत्वका सब को अभिमान होता है वह कर्मेंद्रिय भी अपनी नही। अब मै कुछ बोल भी नही सकता, क्योंकी मेरी वाणी भी मेरी नही है। इसलिये मै जो हू वो मंगलमय शिव ही हु!!

भारतीयांची पुन्हा भरारी....

ताज, CST, आणि ट्रायडंट... अतिरेक्यांच्या हल्ल्यातून फक्त एका महिन्यात सावरत पुन्हा दिमाखदारपणे देशी आणि विदेशी पर्यटकांच्या सेवेत रुजू झाले. हल्ल्याच्या कटू आठवणी मनाच्या कोपर्‍यात चिरकाल राहतील या बद्दल काही शंकाच नाही. परंतू या आठवणींनी रडत न बसता त्यावर मात करून आमच्या हिमतीला कोणी येरागबाळ्याने येउन ललकारू नये अशा आत्मविश्वासानं भारत पुन्हा उभारतोय.

लोकमतला आलेली ही अभिमानास्पद बातमी!

बातमीचा दुवा

ब्राव्हो!

23 November 2008

निर्वाणषटक पर विवेचन - श्लोक १

आद्य श्री. शंकराचार्यजी ने बहोत स्तोत्र तथा षटक संस्कृतमे लिखे है। इन मे वेदसारशिवस्तव, शिवनामावल्याष्टकम्, तथा निर्वाणषटकम् विशेष रुपसे सर्वश्रुत है। चिदानंद रुपम् शिवोहम् शिवोहम् यह उनका निर्वाणषटक जो आत्मषटक इस नाम से भी जाना जाता है।

निर्वाणषटक से संलग्न एक कथा कही जाती है। वो कुछ इस तरह है, एक बार शंकराचार्य अपने गुरूजी से मिलने गये। गुरू अपने कुटीमे बैठे थे। किसे के बाहर आनेकी आहट्से उन्होने अंदरसे ही कुतुहल से पुछा,"कौन है?"। अपने गुरू के इस सवाल का श्री. शंकराचार्यांजीने जो जवाब दिया वो आत्मषटक, निर्वाणषटक इस नाम से भी जाना जाता है।

सर्वसामान्य जन "कौन है?" इस सवाल पर "मै ही हू" यह जवाब दोहराता है। लेकिन श्री. शंकराचार्यजीने सामान्य जन से परे दिया हुआ जवाब उन्हे गुणातीत स्थितप्रज्ञ बना देता है। उनका यही जवाब आत्मषटक कहलाता है। यह निर्वाणषटक हमे बहुत कुछ सिखाता है। अपने गुरूके "कौन है?" इस सवाल का जवाब वह चार पंक्तियोंमे देते है। जवाब के पहली तीन पंक्तियोंमे वह मै कौन नही हू यह बताते है था चौथी पंक्तिमे वह असल मे कौन है यह बार बार दोहराते है। यही उनके इस आत्मषटक की, निर्वाणषटक की, विशेषता है। इस जवाब मे जो एक लय है उससे इन श्लोकोंका अपने मन पर विशेष प्रभाव पडता है। वह सारे आचार्योंसे अलग है, महान है तथा भव्य दिव्य है यह हम समझ सकते है।


मनोबुध्यहंकार चिताने नाहं । न च श्रोतजिव्हे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमी न तेजू न वायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ १ ॥

इस श्लोक के पहले तीन पंक्तीमे वह क्या नही है वह कहते है। अपना शरीर अष्टधा प्रकृतीसे बना है, इसमे पंचमहाभूत जैसे पृथ्वी, आप, तेज, वायू तथा आकाश इनका समावेश होता है। सूक्ष्म तत्व मे मन, बुध्दी तथा अहंकार इनका समावेश होता है। इसका मतलब यह है के अपना देह पंचमहाभूत तथा मन, और बुध्दी तथा अहंकार इनसे बना है। इन पंचमहाभूतोंसे बना अपना शरीर जीवन के अंत मे इन ही पंचमहाभूतोंमे विलीन हो जाता है। मतलब यह के, जिसका लिया उसी को वापस किया। अपना कुछ है ही नही। पंचमहाभूतोंसे आया और वही वापस चला गया। जो अपना नही है उसे अपना कहना गलत है। वह तो एक प्रकार की चोरी ही हुई। इसलिये जिसका उको वापस देने पर अपने पास इस नश्वर शरीर के सिवाय कुछ रहता नही है। इसलिये इस नश्वर शरीर का खुद का ज्ञानेंद्रिय तथा कर्मेंद्रिय ऐसा कुछ भी नही है। जिस नाक, कान, आंख,जुबान तथा त्वचा के जरिये सुख या दुःख मिला है वह भी मेरा नही है। सुख और दुःख यह मन तथा बुद्धी का खेल है। अगर उनका अस्तित्व सुचित नही होता है तो अहंकार के जरिये मिलनेवाला अहंभाव भी सुचित नही होगा। और इसी वजहसे शंकराचार्यजी मे बसा गुणातीत तथा स्थितप्रज्ञ पुरूष अपना अस्तित्व दिखाता है। जो अपना नही है उसे शंकराचार्यजी अपना नही कहते। फिर बाकी रहता क्या है? इस चराचर सृष्टिमे दो ही चिजे है! एक देह दुसरा देही, एक शरीर दुसरा शरिरी, एक देह दुसरा आत्मा, एक क्षेत्रज्ञ तो दुसरा क्षेत्र, अपना नश्वर देह भी अपना नही है। मतलब यही है के जो अपने पास रहता है वो अविनाशी देही, आत्मा।

वह मात्र इश्वर का अंशरूप। और इसलिये शंकराचार्यजी यहा कहते है के, मै मन, बुद्धी, अहंकार, नाक, कान, जुबान, त्वचा, आंखे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश इन मे से कुछ भी नही। बाकी रहा प्राण, आत्मा वही मै हू। और यह आत्मा कैसा है? तो वह भगवंतरूप शिवरूप, सत चित आनंदरूप, शिवरूप है।

07 November 2008

मला बदलायचयं

बरेच दिवस मी कोणाच्या ब्लॉगवर गेले नाही. आज संध्याकाळी जरा सवड काढली आणि गुगल वर सर्च मारला... अमिर खानच्या ब्लॉगच्या पत्त्यासाठी. त्याच्या नावाचा एक ब्लॉग सापडला. आता तिथे त्याचं नाव, एकदम सॉफिस्टिकेटेड भाषा आणि सगळं मुद्द्याला धरून लिहिलेलं होतं म्हणून मी ही माझ्या भोळ्या मनाची समजूत घातली की बये हा ब्लॉग आमिर खानचाच आहे हे मनात ठेवून वाच. उगाच चिकित्सा करत बसलीस की हा ब्लॉग आमिरचाच कशावरून? त्यानीच लिहिलं हे कशावरुन? बरं मिळालेल्या हजारो प्रतिक्रिया या वाचकांनीच दिलेल्या हे कशावरून? तर मग वाचन आणि मनन दुरच राहिल. त्या पेक्षा छान मन लाऊन वाच आणि चिकित्सा करू नकोस! मी त्या ब्लॉगवरची पोस्ट वाचली. आणि कॉमेंट द्यायचा विचार केला. मग वाटलं चित्रीकरणाच्या घाई गर्दीत याला ज्या हजारोंनी कॉमेंट्स येतात त्या हा कधी वाचतो? कधी त्याचा रिप्लाय देतो?

पोस्ट वाचून झाल्यावर एक मनात आलं... आपण ही आपलं वाचन, लिखाण थोडं बदलायचं. भाषेवर थोडी पकड आणायची. आणि स्वतःला थोडं बदलायचं. हा बदल कॉमेंट्स मिळवण्यासाठी नाही तर स्वतःला थोडं अजून सुधरवण्यासाठी... बाहेरच्या दुनियेत थोडंसं वेगळं उठून दिसण्यासाठी... मोजक्याच का होईना पण लोकांनी माझं लिखाण वाचावं आणि विचारावं "अरे... ते ब्लॉगवर लिहिणारी सोनल तूच का?"....

शुभस्य शीघ्रं!! Wish me best luck....

22 October 2008

ब्लॉग अड्डावर माझी टिप

जवळ जवळ एक महिन्यानी मी इंटरनेटला लॉगिन झाले. मागच्या मेल्स पाहिल्या!. ब्लॉग अड्डाच्या ऍडमिनची मेल होती.... माझी टिप कन्सीडर केल्याची. माझं मलाच खुप कौतुक वाटलं. माझ्या नावावर कुठे तरी काही तरी पब्लिश झालय याची मजा वाटत होती. ती मेल डिलीट केली नाहीये. आणि सकाळ पासून किमान १० - १५ वेळा तरी वाचून झालीये. एक मात्र नक्की! जेंव्हा ब्लॉग लिहायला लागले त्यावेळी मी स्वतःला "I was the black ship of the family" असं म्हणून घ्यायची. आता बाकीचे काही म्हणोत स्वतःला एक गोष्ट समजावून सांगितली आहे..... Never care for those who point at you for no reason. Ignorance is the perfect remedy! Take them with you who point at your mistakes and make you improve yourself and make you stand high and with head high held.

आज वटतय आत्ता कुठे सुरुवात आहे. अजुन खुप लिहायचयं.... खुप मोठं व्हायचय! खुप काही करायचयं. देवा जवळ एक मागणं आहे. "लिहिण्यासाठी माझ्याकडे शब्दांची कमी कधी ही पडू देवू नको." हेची दान देगा देवा.!!

ब्लॉग अड्डाच्या ऍडमिन डिपार्टमेंटला माझे अनेक धन्यवाद.

13 September 2008

दिल्लीचे ब्लास्ट्स..

संध्याकाळी सहजच रेडिफला गेले होते. दिल्लीला ४ ब्लास्ट्स झाल्याची बातमी पहिली आणि ठळक होती. बेंगलोरचे ब्लास्ट होऊन २ महिने ही पुरते झाले नाहीत तो हे दिल्लीचे ब्लास्ट्स... १०० पेक्षा जास्त घायाळ आणि १४ जणांचा मृत्यु.... काय मिळालं त्या लोकांना ज्यांनी हे बॉम्ब्स ठेवले? ना मरणार्‍या लोकांशी त्यांचा काही संबंध ना घायाळ लोकांशी... वीक एंडचे किती तरी प्लान्स घेऊन बाहेर पडलेले लोकं... कोणाची आई, कोणाचे वडील, कोणी मित्र... कोणी नातलग... कोणी जवळचे कोणी परिचित... का हे होतयं? याला काही उत्तर आहे? टि.व्ही बघताना जिकडे तिकडे पडलेला रक्ताचा सडा, रडवेले लोकं, कोणाचं मुल हरवलय.. कोणाच्या अजून नातेवाईकांचा पत्ता लागला नाही.. ह्या अशा वगणूकीने कोणी काही मिळवलय का?
रिगल सिनेमा जवळ एक जिवंत बॉम्ब सापडला. हा बॉम्ब फुटला असता तर मृतांची संख्या अजून वाढली असती आणि घायाळांची पण.... बातम्या बघता बघता सहजच मनात आलं एक दिवस देवाला मागणं घालावं... " देवा, अशी शक्ती दे की या सर्व नक्षलवाद्यांच्या, आतंकवाद्यांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना हिप्नॉटाईज करून त्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणावा.... "
देवा... प्लिज काही अवतार घेऊन ये ना परत पृथ्वीतलावर... आम्हाला तुमची गरज आहे. गणपती बाप्पा, तुम्ही विघ्नहर्ते आहात... संकटमोचक आहात... आम्हा सर्वांना मदत करा ना... प्लिज...

व्यथित
सोनल

21 August 2008

वपुर्झा... वपुंच्या आवाजात....

esnips.com... माझ्या फेवरेट साईट्स पैकी एक.. तिथं पुस्तकं, आणि गाणी या दोन्हींचा मी शोध घेते. व.पुंच्या पुस्तकांचा शोध घेणं obvious होतं. तिथे वपुंच्याच आवाजात वपुर्झा सापडलं. मोठा खजिना सापडल्याच्या वर आनंद मला झाला. त्याची प्लेलिस्ट इथे ठेवते आहे... माझ्या संग्रहासाठी

Powered by eSnips.com

17 August 2008

पुस्तकं.... आणि कंटाळवाणी????

एक दिवस रेडिफ़.कॉम साईटचं होम पेज उघडलं आणि एक प्रश्न दिसला... Which is the most boring book that you have read? asked by pranky khan. आणि माझ्या मनात एक प्रश्न आला.... पुस्तक बोअर होतं? पुस्तक, मग ते कुठलं ही असो कधी कंटाळवाणं होऊच शकत नाही. कधी गुज गोष्टी केल्यासारखं तर कधी कोणी समजाऊन सांगितल्या सारखं.. कधी एखादा विनोद तर कधी कोणी कडक शब्दांत केलेली कान उघाडणी... कधी आईच्या प्रेमळ शब्दांनी मनावर घातलेली फुंकर तर कधी वडिलांचा पाठीवर फिरलेला हात.... पुस्तक कोणत्या रुपात पुढे येईल हे ते पुर्ण वाचून संपेपर्यंत सांगता येत नाही. आणि यातली कुठलीच गोष्ट कंटाळवाणी नाहीये. मग पुस्तक कसं कंटाळवाणं होईन? मला तो प्रश्नच काढून टाकावासा वाटला.

असो! पुस्तकावरून आठवलं... कॉलेजात असताना व.पू.काळेंची पुस्तकं मी आधाशा सारखी वाचून काढली होती. माझ्या लायब्ररी कार्डावर अभ्यासापेक्षा जास्त इतर पुस्तकं जास्त असायची. त्यामुळं कधी फाईन भरावा लागला नाही!!!! माझ्याकडच्या पुस्तकाच्या संग्रहातलं माझं आवडतं पुस्तक म्हणजे व.पु.काळेंचं वपुर्झा.... भन्नाट आवडतं ते मला. आणि त्या पाठोपाठ आवडलेलं पुस्तक म्हणजे सिसिलिया अहर्न यांचं PS I Love You. दोन्ही पुस्तकं एकदम मस्त आहेत. वेळ छान जातो पुस्तकांच्या संगतीत. अवास्तव चर्चा नाही की कोणाची वायफळ बडबड नाही. पुस्तक कंटाळवाणं होत नाही..

आता ही पोस्ट वाचलीत ना तुम्ही तर सांगा तुमचं आवडतं पुस्तक....


Happy Reading

11 August 2008

ब्लॉगवर माझी वापसी....

आज जवळ जवळ २ महिन्यांनी मी ब्लॉगवर लिहायला आले. मधले २ महिने खुप धावपळीचे गेले. पॅकिंग, भारतात वापस येणं, इथली सेटलमेंट.... खुप खुप धावपळ झाली. आज दोन महिन्यांनी जेंव्हा ब्लॉगवर गेले तेंव्हा प्रोफ़ाईल विझिट्स पाहिल्या... आणि जवळ उडालेच. १२०० विझिट्स!!! गेल्या वर्षी जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरू केलं होतं तेंव्हा मनात एकदा ही आलं नाही की दिड वर्षात १००० पेक्षा जास्त विझिट्स होतील. इन फ़ॅक्ट १०० विझिट्स ही होतील की नाही असं वाटत होतं. अनेक वेळा असं ही वाटलं की कोणी विझिट करेन की नाही?

माझं पहिलं लिखाण माझे शब्द ह्या श्री. राज जैन यांच्या वेबसाईट्वर झालं. तिथे मला मराठी लिखाणाची चटक लागली असं म्हणायला हरकत नाही! रोज काही ना काही मी तिथे लिहायची. कालांतरानं माझं तिथे जाणं ही कमी झालं आणि नंतर विचारता ती साईटच बंद झाल्याचं कळलं.लिहायची लागलेली सवय घालवावी वाटेना. नुसतं वर्ड मध्ये लिहून ठेवणं ही बरं वाटत नव्हतं. त्यावेळी तात्या अभ्यंकरांच्या ब्लॉगबद्दल कळलं. तिथे जाऊन पाहिलं. मग कळलं की इथं ही लिहिता येतं. मग blogger.com या साईट्ला भेट दिली. तेंव्हा कळलं की हे अजूनच सोपं आहे. कारण माझं गुगल अकाउंट होतं. मग लिहायला लागले. माझे शब्दवर लिहिलेली माझी पहिली कथा ही मी इथं टाकली. शिवाय माझ्या आईनं लिहिलेलं निर्वाण षटकावरील विवेचन इथं दिलं. मग लिहिणं सुचतच गेलं. ड्राफ़्ट्ची सोय असल्यानं अर्धवट लिहून ठेवून नंतर सवडीनं नेट वर टाकलं तरी चालत असल्यानं अजूनच सोप होत गेलं.

मार्च २००७ साली माझ्या ब्लॉगवर मी पहिली पोस्ट लिहिली. शाळेतल्या विद्यार्थ्यानं संदर्भासह स्पष्टीकरण असा प्रश्न सोडवताना असंख्य चुका कराव्या अशी ती पोस्ट होती. आजवर तिला एकही प्रतिक्रिया नाही! आणि मला तिला प्रतिसाद अपेक्षीतही नाही.
पण जसं जसं लिहित गेले तशी सुधारणा होत गेली. आज खुप छान नसलं तरी बर्‍यापैकी लिहिता येतं. प्रतिसाद ही मिळतात. बरं वाटतं.

09 June 2008

तन्मय

तन्मय शाळेत जातोय. त्याला शाळा आवडली. आवडली म्हणजे खुप खुप आणि खुप आवडली. पाऊणच्या सुमारास आम्ही शाळेसाठी निघतो आणि हा पठ्ठ्या सव्वा बारापासून तयार होतो. हो! तो आपला आपला तयार होतोय. शर्ट घालणे, पॅन्ट घालणे, शुज घालणे अगदी सहज करतो तो! सॉक्स घालायला त्याला मदत लागते.. आता वाटतयं तेवढा तरी तो माझ्याकडे येतो "ए आई हे घालून दे ना" असं म्हणत. स्पेलिंग्स वरून शब्द उच्चारायला शिकतोय. वाचायला शिकतोय. फुल काढायचं असलं की फुलचं काढतो. पुर्वी फुल काढायला सुरू करायचा आणि त्याची गाडी कॅटरपिलर वर संपायची. "हे बघ.... मी कॅटापिला (कॅटरपिलर चं त्याचं इंग्रजाळलेलं उच्चारण!)काढलं" "अरे, पण तू फुल काढणार होतास ना?" " हो.." "मग?" "पण मला कॅटापिला आवडतं" मी गप्प!
मधे मिड टर्म हॉलिडेज होते.. (नर्सरीला पण???) एक आठवडा तो सुट्टीवर होता. मग मला मदत केली त्यानी. सगळ्या कामात... कॅप्सिकम चिरून देणे, मटर धुवून देणे, लसणाच्या पाकळ्या सोलणे य किचनच्या मदती सोबत तो झाडाला पाणी पण घालायचा, इकडच्या तिकडच्या खोलीतून सामान आणायचं असलं की मग तो त्याच्या स्कुटरवरून जाऊन आणायचा.
खुप इंडिपेंडंट झालाय तो. आई आणि पपा अधून मधून लागतात त्याला पण नसले तरी त्याची गाडी अडत नाही. तो काढतो रस्ता.
भरपुर प्रश्न आणि दिलेलं उत्तर लक्षात ठेवणं त्याला जमतय. मराठी इंग्रजी आणि अधून मधून हिंदी भाषेत तो मुक्त संचारतो. त्याला आता हिंट्स द्यायला आवडतं. सरळ विचारत नाही. "ते तुझ्या लेफ़्ट हॅंड साईड्ला, रेड कलरचं काय आहे? ते मी सॅंडविच सोबत खातो.... सांग सांग... न बघता सांग..." मग पहिल्या झटक्यात उत्तर दिलं की तो गडबडून जातो... आपली हिंट खुप सोपी होती त्याला कळतं... मग वेगळी वेगळी उत्तर मला चुक द्यायला आवडतं... "ते कधी आपण सॅंडविच सोबत खातो का?" "ते असं असतं का?" असं मी चुक उत्तर दिलं की म्हणतो.... त्याला आवडतं पहिले २ ३ उत्तरं चुकलेलं... मग बरोबर उत्तर दिलं की स्वारी खुष.... पुढच्या हिंटला तयार!!!
"मी आज शाळेत माझ्या पुस्तकातली स्टोरी सांगितली. सगळ्यांना आवडली..." तो येताना काय काय केलं ते सांगतो... त्याला आवडतं सगळं.
सप्टेंबर पासून त्याची शाळा पूर्ण वेळ सुरू होईन... त्याला तितका वेळ शाळेत पाठवताना मला पुन्हा त्याची आठवण येत राहीन.. तो जेवला असेन का? मित्रा सोबत भांडला असेन का? टिचर कडे लक्ष दिलं असेल ना? टीचर रागावली असेन का त्याला? एक ना अनेक...
I will miss him...

01 June 2008

मेघू

"ए मेघे... चल अण्णाकडे जायचं?" जेवढे माझे डोळे चमकायचे ना त्याच्या दुप्पट उत्साहानं ती तयार असायची! "चल.. तू कोणता ज्युस पिणारेस?" " हे हे हे हे... ofcourse पायनॅपल... काय तू पण...!! तू?" "मी पssssण तोच..." आमच्य दोघींचा मोर्चा नांदेडच्या आनंद नगरमध्ये एक ज्युस सेंटर होतं तिथं वळायचा... मस्तपैकी घट्टसर पायनॅपल ज्युस पिऊन आमच्य दोघींची सवारी घराकडे वळायची. कॉलेज सुटल्यावर आम्ही दोघी जवळ जवळ १ तास तरी सोबत असायचो. पण तरीही दारापुढे आम्ही १५ - २० मिनिटं असाच टाईमपास करायचो. काय कारण नसताना उद्या काय करणारेस, आज घरी जाऊन काय करणारेस... जनरल टवाळ्या....

परीक्षा जवळ आली की मग आम्हा दोघींना जाग यायची. मग रात्री १ - २ पर्यंत जागरण... जगरण म्हणजे मेघू एकटीच जागायची. मी साडे अकरा झाले की २ - ४ जांभाया देऊन पावणे बाराच्या सुमारास निद्राधीन व्हायचे... २ वाजता (नसलेल्या) टेन्शननी जाग यायची... मेघू जागीच... "झोप गं मला लाज वाटतेय तू अभ्यास करते आणि मी झोपते त्याची..." असं म्हणलं की मेघू नुस्ती माझ्याकडे बघायची... डोक्यावरून हात फ़िरवायची.... आमची स्वारी निद्रादेवतेच्या कुशीत रमून जायची... थेट सकाळी ५ वाजता... "आयला मी रात्रभर झोपले ना गं मेघे..." असं मी रोजच सकाळी म्हणायचे... आजही मी कधी मधे उशीरा झोपले की मेघूची आठवण येते.

मला खुप वेळा एकटं वाटायचं. आणि ती एक अशी आहे की जिला माझ्या सगळ्या कथा आणि व्यथा न सांगता कळायच्या... किंबहुना तिला अजूनही कळतात... "कशाला चिंता करते? जेंव्हा जे व्हायचय तेंव्हाच ते होणारे. तू गप्प बस." मेघू ठणकून सांगायची.

डिग्री नंतर आम्ही दोघी जवळ जवळ ५ वर्षांनी भेटलो. मेघू पुण्याला माझ्या आईकडे उतरली होती. १ - २ दिवस होती. आम्ही खुपवेळ गप्पा मारल्या. बॅक टू कॉलेज डेज...

आमची आजची रुटीन ऑनलाईन भेट होते.. गप्पा मारतो आम्ही दोघी. but sometimes I feel I m not getting those days back... I miss Meghu... for all those reasons... तिची सनी, तिचा मॉरल सपोर्ट, समजून घेणं आणि समजावून सांगणं, गॅदरिंग मध्ये काढलेली मेंदी, सबमिशनच्या काळात कंप्लिट केलेली जर्नल्स, परीक्षेच्या काळातली नाईट आऊट्स, पायनॅपल ज्युस.... एक ना अनेक.... खुप खुप कारणं आहेत...

I miss u Meghu... :-)
God bless u

26 May 2008

He Loves Me

नेटवर भटकंती करायला मला बर्‍यापैकी आवडतं! आवडतं म्हणल्यापेक्षा मी जवळ जवळ ८०% नेट डिपेंडंट आहे असं म्हणायला हरकत नाही. :-) असो! जसा गुगलचा ब्लॉग आहे ना तसं रेडीफ पण ब्लॉग सारखी सोय देतो. रेडिफ आयलंड या नावाखाली. हा त्याचा दुवा
http://www.rediffiland.com

तर असं रेडिफवर भटकताना मला एक ब्लॉग सापडला ह्या खाली दिलेल्या दुव्यावर!
nld707.rediffiland.com

तिथली ही एक अप्रतिम पोस्ट!!! तितली नावाच्या एका मुलीची. ह्या पोस्ट बद्दल मी जास्ती लिहिणार नाही. तुम्हीच वाचा आणि सांगा आवडते का!

HE loves me

Her name is Titli (butterfly). Her eyes are full of life. Just as butterfly, I have always seen her with best of her mood all the time. She loves sun, she loves trees, she loves the breeze. She always sits near the window of her room to gaze outside.
Her room has a tiny bed which is enough for this 10 yrs girl. It always has white bed sheet, neatly tucked in all side. There is a table next to her bed. It always has flowers which just enhances the beauty of her room. Though it is not needed .. because her presence itself is so beautiful. When she sees any butterfly, her face just lights up like 1000W bulb .. even brighter than any commercial light. When she sees any bird, she goes on telling things of her heart. She wonders how a butterfly can be so colorful. She tries to understand, how a bird can fly so high. She always wonders how flowers can give such sweet fragrance.

I feel so joyous when I am with her. But the moment I come out of her room, darkness fills my heart. I feel so much of pain which is beyond ex-pression. As I come out of her room and walk in the corridor of the hospital, my heart cries out "Why LODD !!! Why to her". But tears can never roll out of my eyes because I remember Titli saying "God has made these flowers. God has created birds and butterflies. God has made all these for me, because HE loves me. And HE will never forsake me. HE is in full control".

Here are some quotes from Bible which exactly depicts this:
Therefore I tell you, do not worry about your life, what you will eat or drink; or about your body, what you will wear. Is not life more important than food, and the body more important than clothes? Look at the birds of the air; they do not sow or reap or store away in barns, and yet your heavenly Father feeds them. Are you not much more valuable than they? Who of you by worrying can add a single hour to his life?

"And why do you worry about clothes? See how the lilies of the field grow. They do not labor or spin. Yet I tell you that not even Solomon in all his splendor was dressed like one of these. If that is how God clothes the grass of the field, which is here today and tomorrow is thrown into the fire, will he not much more clothe you, O you of little faith? So do not worry, saying, 'What shall we eat?' or 'What shall we drink?' or 'What shall we wear?' For the pagans run after all these things, and your heavenly Father knows that you need them. But seek first his kingdom and his righteousness, and all these things will be given to you as well. Therefore do not worry about tomorrow, for tomorrow will worry about itself. Each day has enough trouble of its own.

02 March 2008

जुनं ते सोनं

सारेगम - १९९८



सा रे ग म ची मी असंख्य फ़ॅन्स पैकी एक! अगदी पहिल्य एपिसोड पासून आज पर्यंतच्या एपिसोड्स पर्यंतचे अल्मोस्ट सगळॆ एपिसोड्स मी पाहिलेत. संजीवनी भेलांडे, बेला शेंडे, हमसिका अय्यर, सुदेष्णा, मुकुंद फणसळकर, पार्थिव गोहिल, मोहम्मद वकील, अमेय दाते, त्यागराज खडिलकर हे सगळॆ त्यावेळेसच्या पार्टीसिपण्ट्सपैकी होते. सारेगमचा सेट अगदी साधा होता. पण जे परिक्षक यायचे ते दिग्गज होते. खय्याम साब, अनिल विश्वास, परवीन सुल्ताना, ओ.पी. नय्यर, पं. जसराज, हरिप्रसाद चौरासिया, पं. रवीशंकर असे सगळे एकाहून एक सरस परिक्षक होते. त्यावेळेसचे राऊंड्स ही अवघड होते. नॉन ऑर्केस्ट्रा राउंड-ज्यात गाणं म्हणताना मागे वाद्य वाजायची नाहीत, कॉर्ड राउंड-ज्यात गाण्याची ओरिजिनल पट्टी सोडून वेळेवर दिलेल्या नव्या पट्टीत गाणं म्हणायला लागायचं, जजेस चॉईस राऊंड-जिथं वेळेवर परिक्षक जे गाणं देतील ते गाणं गायला लागे.... एकूणच स्पर्धकाचा कस लागायचा.

सारेगमप - २००८




सारेगमप चा पुर्वीचा सुत्रधार सोनू निगम सोडून गेला आणि सारेगमची वाट अचानक उतरतीला लागली. मधली २ वर्ष सारेगम एकदमच बोअर व्हायला लागलं. पण शान आला आणि सारेगमपमध्ये पुन्हा जीव आला असं मी म्हणेन. नव्या काळाला अनुसरून सेट बदलला गेला. पण गाणी राऊंड्स आणि जजेस यांना स्कोप होता. मधल्या काळात मी टिव्हीपासून तशी बर्‍यापैकी दुरावले. आणि पर्यायानं सारेगम पासूनही. पण युट्युबवर सारेगमपच्या गेल्यावर्षीच्य़ा क्लिप्स पाहिल्या आणि वाटलं या sms च्या भडिमारात गाणं दुरावतय सारेगम पासून.

जजेसची आपापसातली भांडणं, माझा स्पर्धक श्रेष्ठ आणि तुझा कनिष्ठ आणि प्रेक्षकांचे sms या मध्ये स्पर्धकाचा कस ओळखला गेला नाही. पुनम यादवचं स्पर्धेतून बाद होणं, लिट्ल चॅम्प्स मधून वसूंधराचं बाद होणं... या अशा घटनांमध्ये वाटतं जर sms पद्धती ठेवायचीच आहे तर स्पर्धेला परिक्षक बोलावूच नये. आजचं सारेगम पाहताना वाटतं प्रायमरी स्कूलच्या गायनाच्या स्पर्धेला हायस्कूलचे विद्यार्थी जज म्हणून बोलावले आहेत.

या पोस्ट्चा हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नाहीये. सारेगमच्या smsच्या पद्धतीत चांगले स्पर्धक आणि सोज्वळ स्पर्धा बाद होते आहे. या पोस्टद्वारे सारेगमपच्या गजेद्र सिंगला एक विनंती आहे. सारेगमच्या आजपर्यंतच्या यशात तुमच्या टीमची खुप मेहनत आणि परिश्रम आहेत. परंतू sms पद्धतीने सारेगमची जुनी ओळख झाकली जाते आहे. तुमचा हेतू चांगला आहे यात शंका नाही. पण जुनं सारेगम पाहताना जसं हरवून जायचे तसं आजचं सारेगम पाहताना होत नाही. काहीतरी चुकतयं. काय चुकतय आपण जाणता. जुनं सारेगम आम्हाला परत द्याल?

जुन्या सारेगमची एक विजेती होती स्नेहा पंत. तिचा हा व्हिडिओ. इथं एम्बेड करता आला नाही. नक्की पहाल. मला काय म्हणायचं आहे कदाचित तुम्हाला कळेन.

सारेगमपच्या यशासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

06 February 2008

एग्झाम्स!

इतनी शिद्दत से मैने डिग्री पाने की कोशिश की है
के हर जर्रेने मुझसे मार्क्स दिलाने की साझिश की है...

वो कहते है के अगर तुम दिल से किसी सब्जेक्ट मे पास होना चाहो
तो सारी कायेनात तुम्हे पास करवाने मे लग जाती है...

ये एग्झाम्स भी अपनी हिंदी फिल्मों की तरह होती है
अंत तक सब कुछ अच्छा हो ही जाता है..

Happy Endings!!!

अगर कुछ अच्छा नही होता तो एग्झाम्स कभी खतम नही हुआ....
सप्लिमेंटरी अभी बाकी है मेरे दोस्त!!!

:-)

31 January 2008

फिलॉसॉफी!!

"मला आज खुप बोअर होतय गं... तेच ते आणि तेच ते!! काही नवीन नाहीये.." वसू वैतागून अनघाशी बोलत होती. डेस्कवर बसून पेपर्स वाचता वाचता अनघानं डोळे वर केले आणि पुन्हा पेपर्स मध्ये डोकं घातलं. अनघा वसूधाची चांगली मैत्रीण. तिला बोलतं कसं आणि कधी करायचं हे तिला कळायचं. पहिल्या वाक्याला काही बोललं नाही, तिला टोकलं नाही की वसू मन मोकळी बोलते हे तिला माहित होतं. वसूच्या या वाक्यावर त्यामुळं तिनं काही प्रतिसाद दिला नाही. "अन्या मला बोअर होतय गं!!!!!!!!" वसू ऑलमोस्ट ओरडली... "का गं? काय झालं? कोणी काही बोललं का ऑफिसात? काही टॉण्ट?" वसूच्या घरचे सगळे डिटेल्स अनघाला माहित होते. त्यामुळं घरुन नक्की काही प्रॉब्लेम नसणार या बद्दल ती १००% शुअर होती. "काही झालं नाहीये गं. पण मला तरीही बोअर होतय. तेच पेपर्स, तेच ऑफिस, तिच बस, टायमिंग पण कधी बदलत नाही. मला जाम कंटाळा आलाय! तू बोल ना काही तरी...."
"वसू...तुझ्या मागच्या खिडकीतून काय दिसतं गं तुला?"
"खिडकीतून?? मोकळं आकाश, उडणारे पक्षी, बिल्डींग्स, टेरेसवरचं काही पब्लिक, खाली गाड्या, बसेस, चहल पहल... बरचं काही दिसतंय."
"हं! मला एक सांग वसू...तुला पक्ष्यांत काय आवडतं?"
"पक्षी ना?? सगळ्यात सुखी!! मनात आलं की आकाशात मनात आलं की पुन्हा घरट्यात! भुक लागली की गेले उडत एखादा किडा पकडायचा आणि खाऊन पोट भरायचं... पिलं मोठी झाली की त्यांच्या जबाबदार्‍या संपल्या. कोणी कोणावर डिपेंडंट नाही. कोणी रोकणारं टोकणारं नाही की कशाचं टेन्शन नाही!!!!"
"वसू?"
"तुला एक विचारू??"
"विचार ना!! बिनधास्त!"
"तुला आवडेल पक्षांसारखं व्हायला?? त्यांच्या सारखं उडायला? मोकळ्या आकाशात उंच गगनाला गवसणी घालायला..."
अनघाचं वाक्य संपेपर्यंत वसू जवळ जवळ ओरडली, " ए बाई, माझ्या घरी माझ्या डिपेंडींग आहे पब्लीक.. नवरा, बच्चू, सासू सासरे आणि आई बाबा...."
"बघ! तूच कसा विचार करते आहेस! मी तुला घरटं सोडून जा असं कधी म्हटलं नाही... I just asked u wud u like to be a bird?"
"तुला नेमकं काय म्हणायचं आहे अनघा?"
"अगं आकाशात गवसणी घाल, उंच भरारी मार...पक्षांसारखं इंडिपेंडंट हो!!! तुझ्याकडे जमिनीवरून पाहणार्‍या लोकांना जरा नजरेला आनंद मिळू दे..तू पिंजर्‍यात बसून राहिलीस तर त्यांना ही अवघड वाटेल! उंच भरारी घे....आकाशाला गवसणी घाल..आणि बघ दिवसाच्या शेवटी जेंव्हा घरट्यात परत येशील ना तेंव्हा सगळे येतील तुला घरात घ्यायला. आणि हे रोजचं जरी झालं ना तरी त्यात एक कौतुक असतं. ते कधी विसरता येत नाही आणि त्या इतका आनंदही कशात नाही!! एकदा या रुटीनच्या पलिकडे नजर टाकून बघ. दुनिया खुप छान आहे. बोअर व्हायचा, कंटाळा यायचा चान्स नाही! पक्षांकडून, गाडी वाहनांकडून, बिल्डींगवर उभ्या राहिलेल्या माणसांकडून अगदी आपल्या रिसेप्शनजवळच्या ऍक्वॅरियम मधल्या माश्यांकडून ही खुप काय काय शिकायला मिळतं. एकदा नजर टाकून बघ तर!"
अनघा बोलत होती...वसू शिकत होती.
आज घरी जाता जाता सगळ्यांना या विक एंडला थोडा change कसा द्यावा याचा विचार करत होती..