नेटवर भटकंती करायला मला बर्यापैकी आवडतं! आवडतं म्हणल्यापेक्षा मी जवळ जवळ ८०% नेट डिपेंडंट आहे असं म्हणायला हरकत नाही. :-) असो! जसा गुगलचा ब्लॉग आहे ना तसं रेडीफ पण ब्लॉग सारखी सोय देतो. रेडिफ आयलंड या नावाखाली. हा त्याचा दुवा
http://www.rediffiland.com
तर असं रेडिफवर भटकताना मला एक ब्लॉग सापडला ह्या खाली दिलेल्या दुव्यावर!
nld707.rediffiland.com
तिथली ही एक अप्रतिम पोस्ट!!! तितली नावाच्या एका मुलीची. ह्या पोस्ट बद्दल मी जास्ती लिहिणार नाही. तुम्हीच वाचा आणि सांगा आवडते का!
HE loves me
Her name is Titli (butterfly). Her eyes are full of life. Just as butterfly, I have always seen her with best of her mood all the time. She loves sun, she loves trees, she loves the breeze. She always sits near the window of her room to gaze outside.
Her room has a tiny bed which is enough for this 10 yrs girl. It always has white bed sheet, neatly tucked in all side. There is a table next to her bed. It always has flowers which just enhances the beauty of her room. Though it is not needed .. because her presence itself is so beautiful. When she sees any butterfly, her face just lights up like 1000W bulb .. even brighter than any commercial light. When she sees any bird, she goes on telling things of her heart. She wonders how a butterfly can be so colorful. She tries to understand, how a bird can fly so high. She always wonders how flowers can give such sweet fragrance.
I feel so joyous when I am with her. But the moment I come out of her room, darkness fills my heart. I feel so much of pain which is beyond ex-pression. As I come out of her room and walk in the corridor of the hospital, my heart cries out "Why LODD !!! Why to her". But tears can never roll out of my eyes because I remember Titli saying "God has made these flowers. God has created birds and butterflies. God has made all these for me, because HE loves me. And HE will never forsake me. HE is in full control".
Here are some quotes from Bible which exactly depicts this:
Therefore I tell you, do not worry about your life, what you will eat or drink; or about your body, what you will wear. Is not life more important than food, and the body more important than clothes? Look at the birds of the air; they do not sow or reap or store away in barns, and yet your heavenly Father feeds them. Are you not much more valuable than they? Who of you by worrying can add a single hour to his life?
"And why do you worry about clothes? See how the lilies of the field grow. They do not labor or spin. Yet I tell you that not even Solomon in all his splendor was dressed like one of these. If that is how God clothes the grass of the field, which is here today and tomorrow is thrown into the fire, will he not much more clothe you, O you of little faith? So do not worry, saying, 'What shall we eat?' or 'What shall we drink?' or 'What shall we wear?' For the pagans run after all these things, and your heavenly Father knows that you need them. But seek first his kingdom and his righteousness, and all these things will be given to you as well. Therefore do not worry about tomorrow, for tomorrow will worry about itself. Each day has enough trouble of its own.
26 May 2008
02 March 2008
जुनं ते सोनं
सारेगम - १९९८
सा रे ग म ची मी असंख्य फ़ॅन्स पैकी एक! अगदी पहिल्य एपिसोड पासून आज पर्यंतच्या एपिसोड्स पर्यंतचे अल्मोस्ट सगळॆ एपिसोड्स मी पाहिलेत. संजीवनी भेलांडे, बेला शेंडे, हमसिका अय्यर, सुदेष्णा, मुकुंद फणसळकर, पार्थिव गोहिल, मोहम्मद वकील, अमेय दाते, त्यागराज खडिलकर हे सगळॆ त्यावेळेसच्या पार्टीसिपण्ट्सपैकी होते. सारेगमचा सेट अगदी साधा होता. पण जे परिक्षक यायचे ते दिग्गज होते. खय्याम साब, अनिल विश्वास, परवीन सुल्ताना, ओ.पी. नय्यर, पं. जसराज, हरिप्रसाद चौरासिया, पं. रवीशंकर असे सगळे एकाहून एक सरस परिक्षक होते. त्यावेळेसचे राऊंड्स ही अवघड होते. नॉन ऑर्केस्ट्रा राउंड-ज्यात गाणं म्हणताना मागे वाद्य वाजायची नाहीत, कॉर्ड राउंड-ज्यात गाण्याची ओरिजिनल पट्टी सोडून वेळेवर दिलेल्या नव्या पट्टीत गाणं म्हणायला लागायचं, जजेस चॉईस राऊंड-जिथं वेळेवर परिक्षक जे गाणं देतील ते गाणं गायला लागे.... एकूणच स्पर्धकाचा कस लागायचा.
सारेगमप - २००८
सारेगमप चा पुर्वीचा सुत्रधार सोनू निगम सोडून गेला आणि सारेगमची वाट अचानक उतरतीला लागली. मधली २ वर्ष सारेगम एकदमच बोअर व्हायला लागलं. पण शान आला आणि सारेगमपमध्ये पुन्हा जीव आला असं मी म्हणेन. नव्या काळाला अनुसरून सेट बदलला गेला. पण गाणी राऊंड्स आणि जजेस यांना स्कोप होता. मधल्या काळात मी टिव्हीपासून तशी बर्यापैकी दुरावले. आणि पर्यायानं सारेगम पासूनही. पण युट्युबवर सारेगमपच्या गेल्यावर्षीच्य़ा क्लिप्स पाहिल्या आणि वाटलं या sms च्या भडिमारात गाणं दुरावतय सारेगम पासून.
जजेसची आपापसातली भांडणं, माझा स्पर्धक श्रेष्ठ आणि तुझा कनिष्ठ आणि प्रेक्षकांचे sms या मध्ये स्पर्धकाचा कस ओळखला गेला नाही. पुनम यादवचं स्पर्धेतून बाद होणं, लिट्ल चॅम्प्स मधून वसूंधराचं बाद होणं... या अशा घटनांमध्ये वाटतं जर sms पद्धती ठेवायचीच आहे तर स्पर्धेला परिक्षक बोलावूच नये. आजचं सारेगम पाहताना वाटतं प्रायमरी स्कूलच्या गायनाच्या स्पर्धेला हायस्कूलचे विद्यार्थी जज म्हणून बोलावले आहेत.
या पोस्ट्चा हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नाहीये. सारेगमच्या smsच्या पद्धतीत चांगले स्पर्धक आणि सोज्वळ स्पर्धा बाद होते आहे. या पोस्टद्वारे सारेगमपच्या गजेद्र सिंगला एक विनंती आहे. सारेगमच्या आजपर्यंतच्या यशात तुमच्या टीमची खुप मेहनत आणि परिश्रम आहेत. परंतू sms पद्धतीने सारेगमची जुनी ओळख झाकली जाते आहे. तुमचा हेतू चांगला आहे यात शंका नाही. पण जुनं सारेगम पाहताना जसं हरवून जायचे तसं आजचं सारेगम पाहताना होत नाही. काहीतरी चुकतयं. काय चुकतय आपण जाणता. जुनं सारेगम आम्हाला परत द्याल?
जुन्या सारेगमची एक विजेती होती स्नेहा पंत. तिचा हा व्हिडिओ. इथं एम्बेड करता आला नाही. नक्की पहाल. मला काय म्हणायचं आहे कदाचित तुम्हाला कळेन.
सारेगमपच्या यशासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

06 February 2008
एग्झाम्स!
इतनी शिद्दत से मैने डिग्री पाने की कोशिश की है
के हर जर्रेने मुझसे मार्क्स दिलाने की साझिश की है...
वो कहते है के अगर तुम दिल से किसी सब्जेक्ट मे पास होना चाहो
तो सारी कायेनात तुम्हे पास करवाने मे लग जाती है...
ये एग्झाम्स भी अपनी हिंदी फिल्मों की तरह होती है
अंत तक सब कुछ अच्छा हो ही जाता है..
Happy Endings!!!
अगर कुछ अच्छा नही होता तो एग्झाम्स कभी खतम नही हुआ....
सप्लिमेंटरी अभी बाकी है मेरे दोस्त!!!
:-)

31 January 2008
फिलॉसॉफी!!
"मला आज खुप बोअर होतय गं... तेच ते आणि तेच ते!! काही नवीन नाहीये.." वसू वैतागून अनघाशी बोलत होती. डेस्कवर बसून पेपर्स वाचता वाचता अनघानं डोळे वर केले आणि पुन्हा पेपर्स मध्ये डोकं घातलं. अनघा वसूधाची चांगली मैत्रीण. तिला बोलतं कसं आणि कधी करायचं हे तिला कळायचं. पहिल्या वाक्याला काही बोललं नाही, तिला टोकलं नाही की वसू मन मोकळी बोलते हे तिला माहित होतं. वसूच्या या वाक्यावर त्यामुळं तिनं काही प्रतिसाद दिला नाही. "अन्या मला बोअर होतय गं!!!!!!!!" वसू ऑलमोस्ट ओरडली... "का गं? काय झालं? कोणी काही बोललं का ऑफिसात? काही टॉण्ट?" वसूच्या घरचे सगळे डिटेल्स अनघाला माहित होते. त्यामुळं घरुन नक्की काही प्रॉब्लेम नसणार या बद्दल ती १००% शुअर होती. "काही झालं नाहीये गं. पण मला तरीही बोअर होतय. तेच पेपर्स, तेच ऑफिस, तिच बस, टायमिंग पण कधी बदलत नाही. मला जाम कंटाळा आलाय! तू बोल ना काही तरी...."
"वसू...तुझ्या मागच्या खिडकीतून काय दिसतं गं तुला?"
"खिडकीतून?? मोकळं आकाश, उडणारे पक्षी, बिल्डींग्स, टेरेसवरचं काही पब्लिक, खाली गाड्या, बसेस, चहल पहल... बरचं काही दिसतंय."
"हं! मला एक सांग वसू...तुला पक्ष्यांत काय आवडतं?"
"पक्षी ना?? सगळ्यात सुखी!! मनात आलं की आकाशात मनात आलं की पुन्हा घरट्यात! भुक लागली की गेले उडत एखादा किडा पकडायचा आणि खाऊन पोट भरायचं... पिलं मोठी झाली की त्यांच्या जबाबदार्या संपल्या. कोणी कोणावर डिपेंडंट नाही. कोणी रोकणारं टोकणारं नाही की कशाचं टेन्शन नाही!!!!"
"वसू?"
"तुला एक विचारू??"
"विचार ना!! बिनधास्त!"
"तुला आवडेल पक्षांसारखं व्हायला?? त्यांच्या सारखं उडायला? मोकळ्या आकाशात उंच गगनाला गवसणी घालायला..."
अनघाचं वाक्य संपेपर्यंत वसू जवळ जवळ ओरडली, " ए बाई, माझ्या घरी माझ्या डिपेंडींग आहे पब्लीक.. नवरा, बच्चू, सासू सासरे आणि आई बाबा...."
"बघ! तूच कसा विचार करते आहेस! मी तुला घरटं सोडून जा असं कधी म्हटलं नाही... I just asked u wud u like to be a bird?"
"तुला नेमकं काय म्हणायचं आहे अनघा?"
"अगं आकाशात गवसणी घाल, उंच भरारी मार...पक्षांसारखं इंडिपेंडंट हो!!! तुझ्याकडे जमिनीवरून पाहणार्या लोकांना जरा नजरेला आनंद मिळू दे..तू पिंजर्यात बसून राहिलीस तर त्यांना ही अवघड वाटेल! उंच भरारी घे....आकाशाला गवसणी घाल..आणि बघ दिवसाच्या शेवटी जेंव्हा घरट्यात परत येशील ना तेंव्हा सगळे येतील तुला घरात घ्यायला. आणि हे रोजचं जरी झालं ना तरी त्यात एक कौतुक असतं. ते कधी विसरता येत नाही आणि त्या इतका आनंदही कशात नाही!! एकदा या रुटीनच्या पलिकडे नजर टाकून बघ. दुनिया खुप छान आहे. बोअर व्हायचा, कंटाळा यायचा चान्स नाही! पक्षांकडून, गाडी वाहनांकडून, बिल्डींगवर उभ्या राहिलेल्या माणसांकडून अगदी आपल्या रिसेप्शनजवळच्या ऍक्वॅरियम मधल्या माश्यांकडून ही खुप काय काय शिकायला मिळतं. एकदा नजर टाकून बघ तर!"
अनघा बोलत होती...वसू शिकत होती.
आज घरी जाता जाता सगळ्यांना या विक एंडला थोडा change कसा द्यावा याचा विचार करत होती..

09 December 2007
नवी साईट
तन्मय बघता बघता ४ वर्षाचा झाला. वाढदिवस कसा साजरा celebrate या साठी आम्ही दोघंही नेटवर शोधा शोध करत होतो. काही celebration ideas सापडतात का ते बघत होतो. तो एक साईट सापडली. www.sogotall.com बर्यापैकी माहिती आहे य साईट्वर. खुप माहिती अथवा भरपूर माहितीचा खजीना असं काही नाही. कोणीतरी स्वतःसाठी तयार केलेली साईट.. निव्वळ स्वतःचा वेळ कामी लागावा यासाठी केलेल्या वेब पेजेसची ही साईट. popup नाहीत की आजू बाजूला दुसर्या वेब साईट्सच्या ads नाहीत. पण जे काय मटेरियल आहे साईट वर ते छान आहे. तन्मयच्या वाढ्दिवसासाठी celebration idea तिथेच मिळाली.
overall साईट बरी आहे. माहितीचा खजिना नसला तरी तिथल्या भटकंतीत वेळ छान जातो. एकदा नक्की भेट देणेबल आहे साईट.
हा साईट्चा दुवा!
www.sogotall.com

28 October 2007
पाऊस
छान वारा सुटलाय आज सकाळपासून! मागच्या अंगणातली झाडंही आनंदानं वार्यावर झुलत होती. गरम गरम कॉफीच्या घोटासोबत माझी आवडती सेंटीमेंटल्स सुरू होती. दुपारचे ४ वाजलेत आणि बाहेर सात आठ वाजल्यासारखं अंधारून आलयं. खिडकीतून पाहिलं तर रस्ता सगळा ओला! पाऊस कधीचा पडतोय??? मला कळलंही नाही. मला आवडतो पाऊस. असा रिमझिम, कळत नकळत पडणारा. रस्त्याला ओलं करून टाकणारा. बाहेर जाणार्या माणसांना छत्री उघडू की नाही अशा संभ्रमात टाकणारा. संपूर्ण काचेची भिंत, आणि त्यापलीकडे पडणारा रस्त्यावरचा सिमझिम पाऊस! मी किती मागे पोहोंचली माहितिये? मी शाळेत पोहोंचले होते! औरंगाबादला होतो आम्ही. शारदा मंदिरला. असंच अंधारून आलेलं. शाळा सकाळची होती. आई म्हणालेली, "आज शाळा होणार नाही. अगं खुप अंधारून आलयं!" पण शाळेत अशा दिवशीच खुप मजा येते! वर्गात अटेंडन्स कमी आणि मग मॅडमही काही न शिकवता गप्पा मारायच्या आमच्या सोबत. त्यादिवशी ४० जणींच्या आमच्या वर्गात जेमतेम ११ १५ जणी होत्या. बाकी मुलींनी माझ्या मते आयुष्यातला एक सगळ्यात मनमोकळा दिवस एंजॉय केला नाही!
त्यादिवशीचा पाऊस विशेष लक्षात राहिलाय. आम्ही ८ १० जणी मिळून शाळेत एकत्र जायचो. निवांत, गप्पा ठोकत. हसत, खिदळत... ९ च्या दरम्यान सकाळी जोरात पाऊस सुरु झाला आणि सगळी शाळा कॉरिडॉर मधे जमली. मग एका वर्गात जमून गाण्याच्या भेंड्या झाल्या. किती गाणी म्हटली आम्ही!!! दिड तास दणक्यात चाललेली अंताक्षरी पावसाचा जोर कमी होईपर्यंत सुरू होती. पावसाचा जोर कमी झाला आणि आमच्या मॅडमनी शाळा सुटली असं डिक्लेअर केलं. खुप अनिच्छेनं आम्ही सगळ्य़ांनी शाळा सोडली. एरव्ही बारा वाजल्यापासून घड्याळं चेक करणार्या या पोरी आज घरी जायला नको म्हणत आहेत हे पाहून स्टाफही हसत होता. शाळेतून अकराच्या दरम्यान बाहेर पडलो तो अर्ध्या रस्त्यात पावसानं पुन्हा जोर धरला. नखशिखांत भिजलो होतो आम्ही सगळ्या. एकदम निवांत... कोणी नको भिजू म्हणणारं नव्हतं की कोणी रागावणारं नव्हतं!!! आम्ही मोकाट सुटलो होतो!
सेंटीमेंटल्स आणि सोबत रिमझिम पडणारा पाऊस असला की हा दिवस आठवतो. पुन्हा शाळेत जावंसं वाटतं. गाण्याच्या भेंड्या खेळण्यासाठी, मॅडमशी गप्पा मारण्यासाठी, सायकलवर घरी परत येताना जोरदार पावसात नखशिखांत भिजण्यासाठी!!!
आज हा दिवस आठवला त्यावेळी मागं सुमन कल्यणपुर आणि कमल बगोट यांनी गायलेलं गाणं सुरू होतं गरजत बरसत सावन आयो रे!!!!

|
30 September 2007
तुला काय आवडतं गं??
सकाळी सकाळी मला अहोंनी प्रश्न केला "तुला नेमकं काय आवडतं गं?" आणि काही सुचायच्या आत निघून गेलं मला एकदम एकटं बसायला आवडतं. "हा हा हा" असं सातमजली गडगडाटी हसत हे रुम बाहेर गेले आणि दिवस रूटीन सुरू झाला. ब्रेकफ़ास्ट झाल्यावर तन्मय आणि हे दोघं बाहेर गेले. त्यादिवशी बाहेर जायला मी कधी नाही ते नको म्हणाले. मला एक वॉर्निंग मिळाली होती की "यायला उशीर होईल तुला घरी एकटीला बोअर होईल. चल आमच्या सोबत!" पण विचार केला की निवांत रहायला मिळतय कशाला जा आज बाहेर आणि मी "नको, मी येत नाही" असं डिक्लेअर केलं. अकरा - साडे अकराच्या दरम्यान दोघंजणं बाहेर गेले. आणि तन्मयच्या चिवचिवाटानं, हे आणि तन्मय अशा दोघांच्या धिंगाण्यानं भरून जाणार्या आमच्या घरात सामसूम शांतता आली. एक तासाभरात सगळी कामं झाली. मग नेटवर भटकून झालं, गाणी ऐकून झाली, क्रोशाच्या शालीच्या ५ ७ ओळी विणून झाल्या. आणि घड्याळात पाहिलं तर एकच तास संपलेला. आता येतील मग भूक लागेल म्हणून खायच्या तयारीला लागले. तन्मयला मऊ पोहे आवडतात. त्याची तयारी केली. म्हणजे कांदा टोमॅटो चिरला, बटाटा वर काढून ठेवला, कोथिंबीर धूवुन चिरून ठेवली, आणि पोहे भांड्यात काढून ठेवले. १० मिनिट्स संपले.
बापरे!! घरात कोणीच नव्हतं. मला हवा असलेला शांत आणि निवांत वेळ मिळाला होता. पण विचार करत होते तेंव्हा वाटलं की मला खरचं ही शांती, असा निवांतपणा हवाय का? तन्मयचा आवाज नाही, याचा घरात वावर नाही, कोणी बोलायला नाही. मी मला वेळ देऊ शकत होते पण मला करमत नव्हतं. बोअर झालं म्हणून दोघांना मोबाईलवर गाठावं म्हणलं तर यांचा मोबाईल घरातच वाजला. म्हणजे या दोघांशी काही कॉंटॅक्ट पण होणार नव्हता. घर खायला उठलं. काही तरी आठवावं म्हणलं तर तन्मय शिवाय काही आठवत नव्हतं. तो दोन महिन्याचा असताना मी त्याला घेऊन आलेली. त्याला कसं वाढवलं हेच आठवत होतं.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआ असं जोरात ओरडावं वाटलं. तेवढ्यात बेल वाजली. "आआआआई, हाय!" असा तन्मयचा आवाज आला. लहान मुलाला, "तुला आईसक्रीम ठेवलय. ये खायला" असं सांगीतल्यावर कसं पळत येतात ना मी तशीच पळत दाराकडे गेले. आणि कबूल केलं "तुम्ही घरात नव्हता. मला हवा तसा वेळ मला मिळाला होता. पण मला खरचं करमलं नाही." पहिल्यांदा आयुष्यात मला वाटलं होतं की निवांत आणि शांत वेळ एकटीनं घालवणं नसतं. सगळ्य़ांसोबत राहणं, गप्पा मारणं या सारखं सुख नाही.
मला एकटं रहायला आवडत नाही... मला सगळं आवडतं पण एकटेपणा नाही आवडतं....

Subscribe to:
Posts (Atom)