30 September 2007

तुला काय आवडतं गं??

सकाळी सकाळी मला अहोंनी प्रश्न केला "तुला नेमकं काय आवडतं गं?" आणि काही सुचायच्या आत निघून गेलं मला एकदम एकटं बसायला आवडतं. "हा हा हा" असं सातमजली गडगडाटी हसत हे रुम बाहेर गेले आणि दिवस रूटीन सुरू झाला. ब्रेकफ़ास्ट झाल्यावर तन्मय आणि हे दोघं बाहेर गेले. त्यादिवशी बाहेर जायला मी कधी नाही ते नको म्हणाले. मला एक वॉर्निंग मिळाली होती की "यायला उशीर होईल तुला घरी एकटीला बोअर होईल. चल आमच्या सोबत!" पण विचार केला की निवांत रहायला मिळतय कशाला जा आज बाहेर आणि मी "नको, मी येत नाही" असं डिक्लेअर केलं. अकरा - साडे अकराच्या दरम्यान दोघंजणं बाहेर गेले. आणि तन्मयच्या चिवचिवाटानं, हे आणि तन्मय अशा दोघांच्या धिंगाण्यानं भरून जाणार्‍या आमच्या घरात सामसूम शांतता आली. एक तासाभरात सगळी कामं झाली. मग नेटवर भटकून झालं, गाणी ऐकून झाली, क्रोशाच्या शालीच्या ५ ७ ओळी विणून झाल्या. आणि घड्याळात पाहिलं तर एकच तास संपलेला. आता येतील मग भूक लागेल म्हणून खायच्या तयारीला लागले. तन्मयला मऊ पोहे आवडतात. त्याची तयारी केली. म्हणजे कांदा टोमॅटो चिरला, बटाटा वर काढून ठेवला, कोथिंबीर धूवुन चिरून ठेवली, आणि पोहे भांड्यात काढून ठेवले. १० मिनिट्स संपले.
बापरे!! घरात कोणीच नव्हतं. मला हवा असलेला शांत आणि निवांत वेळ मिळाला होता. पण विचार करत होते तेंव्हा वाटलं की मला खरचं ही शांती, असा निवांतपणा हवाय का? तन्मयचा आवाज नाही, याचा घरात वावर नाही, कोणी बोलायला नाही. मी मला वेळ देऊ शकत होते पण मला करमत नव्हतं. बोअर झालं म्हणून दोघांना मोबाईलवर गाठावं म्हणलं तर यांचा मोबाईल घरातच वाजला. म्हणजे या दोघांशी काही कॉंटॅक्ट पण होणार नव्हता. घर खायला उठलं. काही तरी आठवावं म्हणलं तर तन्मय शिवाय काही आठवत नव्हतं. तो दोन महिन्याचा असताना मी त्याला घेऊन आलेली. त्याला कसं वाढवलं हेच आठवत होतं.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआ असं जोरात ओरडावं वाटलं. तेवढ्यात बेल वाजली. "आआआआई, हाय!" असा तन्मयचा आवाज आला. लहान मुलाला, "तुला आईसक्रीम ठेवलय. ये खायला" असं सांगीतल्यावर कसं पळत येतात ना मी तशीच पळत दाराकडे गेले. आणि कबूल केलं "तुम्ही घरात नव्हता. मला हवा तसा वेळ मला मिळाला होता. पण मला खरचं करमलं नाही." पहिल्यांदा आयुष्यात मला वाटलं होतं की निवांत आणि शांत वेळ एकटीनं घालवणं नसतं. सगळ्य़ांसोबत राहणं, गप्पा मारणं या सारखं सुख नाही.

मला एकटं रहायला आवडत नाही... मला सगळं आवडतं पण एकटेपणा नाही आवडतं....

3 comments:

प्रभाकर कुळकर्णी said...

म्याडम मी तुमची कमेन्ट फ़ार उशीरा पाहीली . थ्यान्क यु . बरोबर आहे मी आता आताच ब्लोगवर यायला लागलो . मला तुमचे लिखाण खूपच आवडले . मी नेहमी वाचत आहे तुमचे लिख़ाण . तुम्ही ऊत्क्रुश्ट लिहीता . मला अक्षरांवर चन्द्र जर काढायचा असेल तर कसा काढावा ते सान्गू शकाल काय? उदाहरनार्थ blog चे ब्लोग हो ऊन बसत आहे .

प्रभाकर कुळकर्णी said...

म्याडम मी अक्षर माला सोफ़्ट वे अर वापरतो . अक्षर माला ईतकं उत्क्रुश्ट आहे की काही वीचारू नका . पन मला च ते चन्द्र काढता एत नाही . ज्यानी ते मला दीलं आहे मी त्यालाच गाठायचा प्रयत्न करतो . असो . मी तुम्ही सान्गीतलेलं बरहा डाऊन लोड केलं आहे . मला ते आडवं ईन्ग्रजीतलं एस माझ्या डेल च्या ल्याप टोप वर कसं टाईप करावे तेच कळत नाही . अक्षर माला मधे फ़क्‍त त्या चन्द्रा साठी च मी रडत आहे . बाकी सगळं मला एत आहे .
मी कोमेन्ट्स करत नाही . तुम्ही खरोखरच दर्जेदार लिहीता . उत्क्रूश्ट लिहीता . ईन्टर नेट वर मराठी काय काय आहे ते पहावे म्हनून शोधत होतो तर हा ब्लोगिन्ग हा प्रकार कळाला . फ़ारच खूश झालो . त्या मधे तुमचा ब्लोग सगळ्यात जास्त आवड्ला . जे खरं आहे ते बोललो .
कीप इट अप . तुम्ही खरोखरच फ़ार छान लिहीता .
धन्यवाद . बरहा बद्दल वेगळे थ्यान्क्स .

प्रभाकर कुळकर्णी said...

म्याडम धन्यवाद,
१)अक्षर माला सारखे सोफ़्टवेअर दूसरे कोनतेही नाही. कारन जेव्हा पाहीजे तेव्हा इन्ग्लिश जेव्हा पाहीजे तेव्हा मराठी अथवा हीन्दी कि शिफ़्ट केली की करता येते.
२)याहू वर च्याटीन्ग करताना मराठी फ़ोन्ट्स मधे डायरेक्ट टाईप करून सेन्ड करता येते . कलर , साईझ चेन्ज करता येते .
३)एम एस एक्सेल , वर्ड मधे डायरेक्ट मराठी मधे ज्या पाहेजे त्या रन्गात , साईझ , स्टाईल मधे टाईप करता येते.
माझा एकच प्रश्न आहे . मला ते "चन्द्र " काढता येत नाही. माझी नोट बूक डेल इन्स्पीरोन ६४०० आहे . तीत १ च्या की वर शिफ़्ट मारलं तर उद्गार वाचक चिन्ह उमटते . १ च्या डाव्या बाजूला जी की आहे ती अल्जेब्रा मधले ग्रेटर द्यान स्मालर द्यान ची की आहे . ते ऊलटं आणि आडवं ईन्ग्लिश "एस" की बोर्ड वर एका की वर आहे . पण ते शिफ़्ट मारून मारले तरी ऊमटत नाही . मी काही तरी ्प्रयत्न करतो . धन्यवाद .
तुम्हाला अक्षर माला पाहीजे असेल तर मला ई मेल आय डी कळवा . मी पाठवतो . तूमच्या कडे अक्षर माला आहे काय? असेल तर हो म्हनून कळवा . मला अक्षर माला मराठी ग्रूप मधील एका सज्जना कडून ई मेल नीच मीळाली. त्या दिवसा पासून माझे जगच बदलेले आहे . मी तो ई मेल कधीच डीलीट करनार नाही . तूमच्या मूळे मला esnips साईट मिळाली . ते सु्प्रभातम रीमीक्स अप्रतीम आहे . मी आपला फ़ार फ़ार आभारी आहे . माह्या कडे डेस्क टोप कोम्प्युटर पन आहे . पण मी नेट चे कनेक्षन नोट बूक ला केले आहे . ज्या ने मला अक्षर माला पाठवली आहे त्याचीच मी मदत घेतो . तूम्ही ऊगीच त्रास घेत बसू नका . तूम्ही फ़ार छान लिहीता . अजून बरेच लोक ब्लोग लिहीतात . तेही फ़ार छान लिहीतात . सगळ्यानाच तूम्हा लोका सारखं लिहीता येत नाही .