26 September 2009

छोटीशी गोष्ट!!

अनेकदा गोष्ट तशी फुटकळच असते.. म्हणजे अनेकांच्या लेखी ती कदाचित दखल घेण्यासारखी नसते ही. मी जवळ जवळ अडीच वर्षे झाली ब्लॉगिंग करते आहे. कधी नियमित कधी काही ना काही कारणानं होणारा विलंब... परंतू ब्लॉगिंगशी नातं कायम आहे. तशातच ब्लॉगरनी एखादा आवडीचा ब्लॉग फ़ॉलो करणारी सुविधा दिली. माझा ब्लॉग साधाच.. त्याची भाषा आणि त्याचे विषय दोन्ही साधेच... आणि त्यामुळं माझा ब्लॉग कोणी फ़ॉलो करेन असं मला वाटलं ही नाही.

एक दिवस माझ्या पोस्ट्स बघत होते तर माझ्या डायरीच्या ब्लॉगला एक फ़ॉलोवर दिसला... क्या बात है!!! असा विचार करत चेहेर्‍यावर एक हसू आलं.... मग एक दिड महिन्यानी अजून एक फ़ॉलोवर दिसला.. कित्येकांच्या ब्लॉगचे ५० १०० फ़ॉलोवर्स असतात... माझ्या साध्या ब्लॉगला कोणी तरी फॉलो करतय ही भावना छान वाटली. आज माझ्या अजून एका ब्लॉगला एक फ़ॉलोवर आहे... तिथे नवीन पोस्ट वाढवावीशी वाटली... गोष्ट छोटीशीच आहे. पण खुप छान वाटतय.

माझा साधासुधा ब्लॉग फ़ॉलो करण्यासाठी अनेक धन्यवाद!!!

सोनल

6 comments:

Mahendra said...

कोणी फॉलो करतोय हे समजलं तर बरं वाटतं. तुम्ही जरा रेगुलरली लिहित जा, म्हणजे जरी कोणी फॉलो केलं नाही तरिही वाचक मात्र मिळतिल.

Sonal said...

तसं बर्‍यापैकी रेग्युलर लिहिते. पण कधी मधे उशीर झाला तर मात्र लिहिणं होत नाही.

Asha Joglekar said...

उत्तरोत्तर असेच पॉलोअर मिळोत. लिहिल्याने होत आहे रे ते आधी लिहिलेच पाहिजे .

veerendra said...

असेच फोलोवर मिळोत .. : माझ्या ब्लॉगवर नियमित प्रतिक्रिया दिल्याबद्दल शतशः आभार !

Medha said...

अजुन एक follower :)

Sonal said...

wow!!