15 March 2009

भाषा

नवीन गोष्ट लिहावीशी वाटतेय... प्लॉट तयार करावासा वाटतोय.. पण मला ना टॉपिक सुचत नाहिये कथेसाठी. ह्म्म.. बघू कोणी प्रतिक्रियेत सुचवतं का एखादा स्टोरी लिहिणेबल टॉपिक... लिहिणेबल वरून लक्षात आलं... माझी भाषा जरा चेंजत चाल्लीये... म्हणजे बदलत चाल्लीये.. करणेबल, खाणेबल, मी थिंकतीये.... मी सिंगतीये... मी वॉकतीये... मी कुकतीये... हा हा हा हा.. OMG.. कसली भन्नाट भाषा बोलतीये मी गेल्या १ २ महिन्या पासून.. आणि गम्मत म्हणजे तन्मय पण बर्‍यापैकी पिकतोय (पिक करतोय) ही भाषा... तो एक दिवस माझ्या पप्पांना म्हणाला.."आजोबा एक मिनिट थांबा मी थिंकतोय.. थिंकून झालं की सांगतो तुम्हाला..." मी चाटच पडले...

जरा चेंज म्हणून ही भाषा बरी वाटते. Not for serious studd though! असो! टॉपिक सुचतोय का काही?? टेला मला...

2 comments:

आशा जोगळेकर said...

झोप, कसा वाटला .

Sonal said...

झोप छान टॉपिक आहे. अजून एक दोन टॉपिक्सची वाट बघते आणि मग लिहिते! ओके?