संध्याकाळी सहजच रेडिफला गेले होते. दिल्लीला ४ ब्लास्ट्स झाल्याची बातमी पहिली आणि ठळक होती. बेंगलोरचे ब्लास्ट होऊन २ महिने ही पुरते झाले नाहीत तो हे दिल्लीचे ब्लास्ट्स... १०० पेक्षा जास्त घायाळ आणि १४ जणांचा मृत्यु.... काय मिळालं त्या लोकांना ज्यांनी हे बॉम्ब्स ठेवले? ना मरणार्या लोकांशी त्यांचा काही संबंध ना घायाळ लोकांशी... वीक एंडचे किती तरी प्लान्स घेऊन बाहेर पडलेले लोकं... कोणाची आई, कोणाचे वडील, कोणी मित्र... कोणी नातलग... कोणी जवळचे कोणी परिचित... का हे होतयं? याला काही उत्तर आहे? टि.व्ही बघताना जिकडे तिकडे पडलेला रक्ताचा सडा, रडवेले लोकं, कोणाचं मुल हरवलय.. कोणाच्या अजून नातेवाईकांचा पत्ता लागला नाही.. ह्या अशा वगणूकीने कोणी काही मिळवलय का?
रिगल सिनेमा जवळ एक जिवंत बॉम्ब सापडला. हा बॉम्ब फुटला असता तर मृतांची संख्या अजून वाढली असती आणि घायाळांची पण.... बातम्या बघता बघता सहजच मनात आलं एक दिवस देवाला मागणं घालावं... " देवा, अशी शक्ती दे की या सर्व नक्षलवाद्यांच्या, आतंकवाद्यांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना हिप्नॉटाईज करून त्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणावा.... "
देवा... प्लिज काही अवतार घेऊन ये ना परत पृथ्वीतलावर... आम्हाला तुमची गरज आहे. गणपती बाप्पा, तुम्ही विघ्नहर्ते आहात... संकटमोचक आहात... आम्हा सर्वांना मदत करा ना... प्लिज...
व्यथित
सोनल
13 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
मी देखिल व्यथीत झालो या बातम्या बघतांना. खरच काय साधते या अतिरेक्यांच्या दहशदवादी कारवायांनी ? आता पर्यंतचा इतिहास पाहीला असता यांचे कोणतेही दिर्घकालीन उद्दी्ष्टे या दहशदवादांची या अतिरेकी मार्गानी साध्य झालेली नाहीत तरी देखील निरपराध माणासांना मारुन यांना काय मिळते ?
निरपराधांमध्ये कित्येक लहान मुलं होती... ७० वर्षाच्या म्हातार्या आईला मुलाची वाट आहे...जख्मी पती आपल्या पत्नीची वाट पाहतो आहे.. एका परिवारातील ८ जण मृत्युमुखी पडलेत.... रमजानच्या पवित्र महिन्यातील रोजा सोडताना शोएब जख्मी झालेत... खरचं या दहशतवाद्यांना काय मिळवायचयं?
व्यथित होणारे हळवे मन हवे... ते तुमच्याजवळ आहे. या मनाला जपा. खूप कमी लोकांकडे ते उरले आहे. त्यामुळे त्याची किम्मत फार-फार मोठी आहे. लिखाणातून अस्वस्थता जाणवते
हरेकृष्णाजी आणि प्राजक्ता, तुमच्या अभिप्राया बद्दल अनेक धन्यवाद. :-)
Post a Comment