|
धुंद होते शब्द सारे
धुंद होत्य भावना
वार्यासंगे वाहता
त्या पुलापाशी थांब ना
सये... रमूनी सार्या या जगात
तिक्त व्हावेसे
परी कैसी ही प्रित ही?
धुंद होते शब्द सारे.....
मेघ दाटूनी गंध लहरूनी
बरसला मल्हार हा
चांद राती भाव गुंतुनी
बहरला निशीगंध हा
का कळॆना काय झाले
भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा
विश्रांत हा
शांत हा
धुंद होते शब्द सारे
धुंद होत्य भावना
वार्यासंगे वाहता
त्या पुलापाशी थांब ना
सये... रमूनी सार्या या जगात
तिक्त व्हावेसे
परी कैसी ही प्रित ही?
3 comments:
खुपच सुंदर कविता आहे ही...
मनापासुन आवडली मला...
माझा Blog कुठून शोधला?
सोनल देश्पान्डे
म्याडम मी तुमची माझी डायरी वाचत असतो. मी माझी डायरी चा फ़्यान झालो आहे. वा काय कलेक्षन आहे . वा काय लिखान आहे . तुमचं ते सुप्रभातम अती उत्तम आहे . तुमचं ते युअवराज सिन्ग चे सहा छक्के एका ओवर मधे चं यु टू बी चं कलीक्षन छान आहे . तुमचं ते कुम्बळेच्या शतकाचे वर्नन फ़ार छान आहे . मी तुमची माझी डायरी नेहमी वाचत जाईन. तुम्हाला दैवी देनगी दीसत आहे . तुम्ही असेच आमचे ह्या ब्लोग ला भेट देन्यार्यान्चे मनोरन्जन करत चला . तुमच्या कडे कला आहे . लगे रहो .
प्रभाकरजी आणि कल्पेशजी तुम्हा दोघांचे प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार.
Post a Comment