तन्मयची परीक्षा संपली. आणि बघता बघता रिझल्ट पण लागला. रिझल्ट चांगला आला. रिझल्ट दिवशी सगळ्याची आठवण आली. पण सर्व जणांमध्ये प्रकर्षानं कोणाची आठवण आली असावी तर ते म्हणजे स्व. हेमंतकाका धानोरकर. मला आठवतय आम्ही शाळेत होतो. औरंगाबादला नुकतचं शिफ़्ट झालेलो. नांदेडला असताना रिझल्ट दिवशी माझे आजोबा, मोठेबाबा यायचे. आणि विचारायचे "कितवा नंबर आला?". दरवर्षी प्रमाणे मी उत्तर द्यायची "दुसरा". "बरं, मग पहिल्या नंबरच्या बक्षीसात आणि तुझ्या बक्षीसात कितीचा फरक आहे?" मी सांगायची जो काय फरक असेन तो.. मग आजोबा तो फरक त्यांच्याकडून बक्षीस म्हणून भरून काढायचे. असो! औरंगाबादला शिफ़्ट झाल्यावर मग रिझल्ट दिवशी "कोण येणार गं?" असं मी आईशी मोठेबाबांची आठवण आली म्हणून बोलत होते. आमचं बोलणं चालूच होतं तो कोणी तरी आलं म्हणून आईनं दार उघडलं. ६ फुट उंच, सडसडीत, आणि फ्रेश पर्सनालिटीच्या व्यक्तीला मी पाहिलं. "अरे! या नं हेमंत!" असं म्हणत आईनं त्यांना आत घेतलं. त्याचं बोलणं झाल्यावर मोर्चा माझ्याकडे वळला. "मग? काय रिझल्ट लागला?" आणि आश्चर्य म्हणजे मी वर्गात पहिली होते. मग मी तसं सांगितल्यावर मला म्हणे," तुला काय बक्षीस देऊ?" मी चाटच पडले.. आता यांना काय सांगू म्हणून? मग काकाच म्हणाले,"चल आईसक्रीम देतो तुला." मी आणि माझी बहीण आम्हा दोघींना बाईकवर बसवून काकांनी आईसक्रिमच्या दुकानात नेलं आणि टूटीफ्रूटी आइसक्रिमची एक अख्खी ब्रिक गिफ़्ट दिली. आणि जोवर आम्ही औरंगाबादला होतो ती आठवर्ष ती आइसक्रिमची ब्रिक दरवर्षी न चुकता आम्हाला रिझल्ट्चं बक्षीस म्हणून मिळाली....
माझ्या लग्नाच्या आसपास हेमंतकाका ऍक्सिडेंटमध्ये वारले. तन्मयचा यावर्षी पहिला रिझल्ट होता. हेमंतकाका... तुमची आठवण आली. आम्ही दिलं त्याला आईसक्रिम... त्याला तसाच आनंद झाला होता जसा आम्हाला व्हायचा... आणि हो! जसं तुम्हाला हसू यायचं ना.. तसंच हसू आम्हाला ही आलं... तुम्ही असायला हवे होता त्याचं कौतुक करण्यासाठी...
Thanks kaka for ur icecreams!!! I missed them this time.... for tanmay...
29 March 2009
27 March 2009
पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!
सर्वांना मराठी नव वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा
सोनल
गोपाळ
तन्मय!
सोनल
गोपाळ
तन्मय!
22 March 2009
उज्ज्वला
तसं पाहिलं तर आज उज्वलाची आठवण येण्यासाठी तसं काही विशेष कारण घडलं नाही... चित्रा, आणि तिची फॅमिली दुपारी घरी आली होती... सहजच काकूंशी बोलत होते... त्यांच्या भागात राहणार्या MGM च्या, माझ्या कॉलेजच्या मुलींबद्दल... आणि बोलता बोलता त्यांनी घेतलेल्या नावांमध्ये तेलंग नाव आलं. "म्हणजे उज्वला ना?" माझ्या तोंडून निघून गेलं... त्या काहीच बोलल्या नाहीत... होकारार्थ फक्त मान हलवली... "कोण गं?" चित्राच्या या प्रश्नावर "माझी कॉलेजची मैत्रीण.. ती आणि मी प्रोजेक्ट पार्टनर्स होतो" मी येवढंच म्हणू शकले... "मग?" "मग तिचा ऍक्सिडेंट झाला कॉलेजमधून घरी वापस येताना. फायनल ईयर क्लिअर केल्यावर... ती ऑन द स्पॉट गेली." thats it. मी पुढे काहीच बोलू शकले नाही. आणि खुप खुप दिवसांनी तिच्या आठवणींनी डोळ्यात आलेलं पाणी मी पापणीपर्यंत पण येऊ दिलं नाही. It was hard, very hard to control... Very difficult to stop me from remembering her memories... असं का झालं हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येत राहीला. काकू सांगत होत्या, "ती गेल्यापासून तिची आई फारशी कोणात मिक्स होत नाही." ahh that was another hard sentense to hear. कधी वाटतं ती गेली या ऍक्सिडेंट मध्ये ते चांगलं झालं नुसता हात पाय तुटून लुळी पांगळी जगण्यापेक्षा ती निदान गेली तरी. जाणारा माणूस जायचं तेंव्हा जातो. पण हाल न होता जाणं खुप कमी जणांच्या नशीबी असतं. उज्वला हाल न होता गेली... पण मला बाय न म्हणता... आम्हा कोणालाच बाय न म्हणता.... तिच्या मैत्रीणींना पण!
देव आहे ना जगात??? मला एक मागणं आहे देवाकडे.. थोडं फिल्मी आयुष्य होऊ दे ना.. जिचा ऍक्सिडेंट झाला ती उज्वला नसावी आणि कोणीतरी दुसरं असावं... उजू दुसरीकडे कुठंतरी सेफ असावी.. आणि अचानक समोर यावी.. "हाय सोनल" म्हणत... I will hug her tight and will ask her not to go away from us...
देव आहे ना जगात??? मला एक मागणं आहे देवाकडे.. थोडं फिल्मी आयुष्य होऊ दे ना.. जिचा ऍक्सिडेंट झाला ती उज्वला नसावी आणि कोणीतरी दुसरं असावं... उजू दुसरीकडे कुठंतरी सेफ असावी.. आणि अचानक समोर यावी.. "हाय सोनल" म्हणत... I will hug her tight and will ask her not to go away from us...
21 March 2009
लहान मुलाचं हसू :-)) मस्तच आहे
फाल्गुनी पाठकचं हे गाणं मस्तच आहे! यात काही शंका नाही... पण या रीमिक्स मध्ये घेतलेलं लहान मुलाचं हसू त्याहूनही मस्त आहे!!! पूर्ण गाणं ऐकल्यावर मी मात्र खुप एंजॉय केलं...
15 March 2009
भाषा
नवीन गोष्ट लिहावीशी वाटतेय... प्लॉट तयार करावासा वाटतोय.. पण मला ना टॉपिक सुचत नाहिये कथेसाठी. ह्म्म.. बघू कोणी प्रतिक्रियेत सुचवतं का एखादा स्टोरी लिहिणेबल टॉपिक... लिहिणेबल वरून लक्षात आलं... माझी भाषा जरा चेंजत चाल्लीये... म्हणजे बदलत चाल्लीये.. करणेबल, खाणेबल, मी थिंकतीये.... मी सिंगतीये... मी वॉकतीये... मी कुकतीये... हा हा हा हा.. OMG.. कसली भन्नाट भाषा बोलतीये मी गेल्या १ २ महिन्या पासून.. आणि गम्मत म्हणजे तन्मय पण बर्यापैकी पिकतोय (पिक करतोय) ही भाषा... तो एक दिवस माझ्या पप्पांना म्हणाला.."आजोबा एक मिनिट थांबा मी थिंकतोय.. थिंकून झालं की सांगतो तुम्हाला..." मी चाटच पडले...
जरा चेंज म्हणून ही भाषा बरी वाटते. Not for serious studd though! असो! टॉपिक सुचतोय का काही?? टेला मला...
जरा चेंज म्हणून ही भाषा बरी वाटते. Not for serious studd though! असो! टॉपिक सुचतोय का काही?? टेला मला...
14 March 2009
रोहीत राऊत - अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग हे माझ्या अनेक अनेक आवडत्या मराठी गाण्यांपैकी एक. सर्वत्र शोध घेत माझं हे गाणं कायम ऐकणं सुरू असतं. सवयीनं युट्यूबवर मी शोधलं. तिथे रोहीत राऊतच्या गाण्याची लिंक मिळाली. माननीय तौफिक कुरैशी यांच्या उपस्थितीत झालेल्या झी मराठीच्या चिल्ड्रन्स स्पेशलच्या एका एपिसोड मध्ये त्यानं गायलेलं हे गीत. जनरली गाणं जेंव्हा मी ऐकते तेंव्हा मोडक्या आणि फुटून पार मोडलेल्या आवाजात मी ही गाणं गुणगुणते. पण रोहितचं हे गाणं ऐकताना मला इतर कोणाचा आवाज ऐकू ही आला नाही. त्याच्या शब्दांचं उच्चारण, स्टेजवरचा आत्मविश्वास, आणि त्याचा लागलेला सूर! मस्त झालं गाणं. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन... रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन... या दोन ओळींना लागलेला त्याचा आवाज मस्त आहे. "जातीहीन" शब्दातलं त्याचा "ज" चा उच्चार "जात नाही ती जात" यातील "ज" सारखा नाही तर "जीवन सुंदर आहे" मधील "ज" सारखा झालाय... तो भाव खाऊन गेला! रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ही ओळ म्हणताना तो खरचं त्या मध्ये लीन झालेला भासतो. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग.. नाथाघरी नाचे माझा सखा पांडूरंग या ओळींना घेतलेल्या हरकती आणि छोटीशी तान आहाहा असं म्हणायला मला तरी भाग पाडते.
जिओ रोहीत! खुप पुढे जा... तुझ्या वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
~ सोनल
Subscribe to:
Posts (Atom)