तन्मय शाळेत जातोय. त्याला शाळा आवडली. आवडली म्हणजे खुप खुप आणि खुप आवडली. पाऊणच्या सुमारास आम्ही शाळेसाठी निघतो आणि हा पठ्ठ्या सव्वा बारापासून तयार होतो. हो! तो आपला आपला तयार होतोय. शर्ट घालणे, पॅन्ट घालणे, शुज घालणे अगदी सहज करतो तो! सॉक्स घालायला त्याला मदत लागते.. आता वाटतयं तेवढा तरी तो माझ्याकडे येतो "ए आई हे घालून दे ना" असं म्हणत. स्पेलिंग्स वरून शब्द उच्चारायला शिकतोय. वाचायला शिकतोय. फुल काढायचं असलं की फुलचं काढतो. पुर्वी फुल काढायला सुरू करायचा आणि त्याची गाडी कॅटरपिलर वर संपायची. "हे बघ.... मी कॅटापिला (कॅटरपिलर चं त्याचं इंग्रजाळलेलं उच्चारण!)काढलं" "अरे, पण तू फुल काढणार होतास ना?" " हो.." "मग?" "पण मला कॅटापिला आवडतं" मी गप्प!
मधे मिड टर्म हॉलिडेज होते.. (नर्सरीला पण???) एक आठवडा तो सुट्टीवर होता. मग मला मदत केली त्यानी. सगळ्या कामात... कॅप्सिकम चिरून देणे, मटर धुवून देणे, लसणाच्या पाकळ्या सोलणे य किचनच्या मदती सोबत तो झाडाला पाणी पण घालायचा, इकडच्या तिकडच्या खोलीतून सामान आणायचं असलं की मग तो त्याच्या स्कुटरवरून जाऊन आणायचा.
खुप इंडिपेंडंट झालाय तो. आई आणि पपा अधून मधून लागतात त्याला पण नसले तरी त्याची गाडी अडत नाही. तो काढतो रस्ता.
भरपुर प्रश्न आणि दिलेलं उत्तर लक्षात ठेवणं त्याला जमतय. मराठी इंग्रजी आणि अधून मधून हिंदी भाषेत तो मुक्त संचारतो. त्याला आता हिंट्स द्यायला आवडतं. सरळ विचारत नाही. "ते तुझ्या लेफ़्ट हॅंड साईड्ला, रेड कलरचं काय आहे? ते मी सॅंडविच सोबत खातो.... सांग सांग... न बघता सांग..." मग पहिल्या झटक्यात उत्तर दिलं की तो गडबडून जातो... आपली हिंट खुप सोपी होती त्याला कळतं... मग वेगळी वेगळी उत्तर मला चुक द्यायला आवडतं... "ते कधी आपण सॅंडविच सोबत खातो का?" "ते असं असतं का?" असं मी चुक उत्तर दिलं की म्हणतो.... त्याला आवडतं पहिले २ ३ उत्तरं चुकलेलं... मग बरोबर उत्तर दिलं की स्वारी खुष.... पुढच्या हिंटला तयार!!!
"मी आज शाळेत माझ्या पुस्तकातली स्टोरी सांगितली. सगळ्यांना आवडली..." तो येताना काय काय केलं ते सांगतो... त्याला आवडतं सगळं.
सप्टेंबर पासून त्याची शाळा पूर्ण वेळ सुरू होईन... त्याला तितका वेळ शाळेत पाठवताना मला पुन्हा त्याची आठवण येत राहीन.. तो जेवला असेन का? मित्रा सोबत भांडला असेन का? टिचर कडे लक्ष दिलं असेल ना? टीचर रागावली असेन का त्याला? एक ना अनेक...
I will miss him...
09 June 2008
01 June 2008
मेघू
"ए मेघे... चल अण्णाकडे जायचं?" जेवढे माझे डोळे चमकायचे ना त्याच्या दुप्पट उत्साहानं ती तयार असायची! "चल.. तू कोणता ज्युस पिणारेस?" " हे हे हे हे... ofcourse पायनॅपल... काय तू पण...!! तू?" "मी पssssण तोच..." आमच्य दोघींचा मोर्चा नांदेडच्या आनंद नगरमध्ये एक ज्युस सेंटर होतं तिथं वळायचा... मस्तपैकी घट्टसर पायनॅपल ज्युस पिऊन आमच्य दोघींची सवारी घराकडे वळायची. कॉलेज सुटल्यावर आम्ही दोघी जवळ जवळ १ तास तरी सोबत असायचो. पण तरीही दारापुढे आम्ही १५ - २० मिनिटं असाच टाईमपास करायचो. काय कारण नसताना उद्या काय करणारेस, आज घरी जाऊन काय करणारेस... जनरल टवाळ्या....
परीक्षा जवळ आली की मग आम्हा दोघींना जाग यायची. मग रात्री १ - २ पर्यंत जागरण... जगरण म्हणजे मेघू एकटीच जागायची. मी साडे अकरा झाले की २ - ४ जांभाया देऊन पावणे बाराच्या सुमारास निद्राधीन व्हायचे... २ वाजता (नसलेल्या) टेन्शननी जाग यायची... मेघू जागीच... "झोप गं मला लाज वाटतेय तू अभ्यास करते आणि मी झोपते त्याची..." असं म्हणलं की मेघू नुस्ती माझ्याकडे बघायची... डोक्यावरून हात फ़िरवायची.... आमची स्वारी निद्रादेवतेच्या कुशीत रमून जायची... थेट सकाळी ५ वाजता... "आयला मी रात्रभर झोपले ना गं मेघे..." असं मी रोजच सकाळी म्हणायचे... आजही मी कधी मधे उशीरा झोपले की मेघूची आठवण येते.
मला खुप वेळा एकटं वाटायचं. आणि ती एक अशी आहे की जिला माझ्या सगळ्या कथा आणि व्यथा न सांगता कळायच्या... किंबहुना तिला अजूनही कळतात... "कशाला चिंता करते? जेंव्हा जे व्हायचय तेंव्हाच ते होणारे. तू गप्प बस." मेघू ठणकून सांगायची.
डिग्री नंतर आम्ही दोघी जवळ जवळ ५ वर्षांनी भेटलो. मेघू पुण्याला माझ्या आईकडे उतरली होती. १ - २ दिवस होती. आम्ही खुपवेळ गप्पा मारल्या. बॅक टू कॉलेज डेज...
आमची आजची रुटीन ऑनलाईन भेट होते.. गप्पा मारतो आम्ही दोघी. but sometimes I feel I m not getting those days back... I miss Meghu... for all those reasons... तिची सनी, तिचा मॉरल सपोर्ट, समजून घेणं आणि समजावून सांगणं, गॅदरिंग मध्ये काढलेली मेंदी, सबमिशनच्या काळात कंप्लिट केलेली जर्नल्स, परीक्षेच्या काळातली नाईट आऊट्स, पायनॅपल ज्युस.... एक ना अनेक.... खुप खुप कारणं आहेत...
I miss u Meghu... :-)
God bless u

Subscribe to:
Posts (Atom)